अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिकाऊ उमेदवार परीक्षेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:07+5:302021-02-26T04:49:07+5:30

तुमसर : तुमसर तालुक्यातील चिखला माईन येथील खाणीत प्रशिक्षण घेतलेल्या २८ शिकाऊ उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे त्यांनी ...

Apprentice candidate deprived of examination due to negligence of officers | अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिकाऊ उमेदवार परीक्षेपासून वंचित

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिकाऊ उमेदवार परीक्षेपासून वंचित

Next

तुमसर : तुमसर तालुक्यातील चिखला माईन येथील खाणीत प्रशिक्षण घेतलेल्या २८ शिकाऊ उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी लेखी तक्रार दिली असून, मदत करण्याची विनंती केली आहे. या अनुषंगाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी चिखला माईन येथील खाण अभिकर्ता राजेश भट्टाचार्य यांना प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सोबत घेत या संदर्भातील निवेदन देत संपूर्ण प्रकरण निदर्शनाला आणून दिले.

या प्रशिक्षणार्थी उमेदवारांमध्ये डिजल मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिशियन, मॅकेनिकल व कोपा अशा विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतलेले उमेदवार उपस्थित होते. या प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांची नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, नवी दिल्लीच्या माध्यमातून परीक्षा घेणे अपेक्षित होते. परंतु, चिखला माईन येथील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या शिकाऊ उमेदवारांचे अर्ज भरून घेतल्यानंतरही २८ उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत आहे. यावर्षीच परीक्षेला बसता यावे, यासाठीची संबंधित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर कोतपल्लीवार, अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, प्रशिक्षणार्थी मोहिनी मडावी, संतोषी भुरे, अचल बोरकर, संतोषकुमार झोडे, अतुल भिवगडे, कोमल जीभकाटे, प्रदीप आचारकते, अवन सोनकालिहारी, राहुल बांडेबूचे, कुणाल चौरे, हेमंत नौखरे, शैलेश मेश्राम, निखील मानापुरे, रोहित पराते, राहुल मालाधरी, शैलेश कुंभरे, आदेश मदनकर, चंदेश खंगार, राहुल गाढवे, अतुल अवतारे, नितीन वरखडे, पंकज सिरसाम, सचेंद्रकुमार चौधरी, स्वप्नील परतेती, दीपक सरंगडे, शिवण घिदोल, राहुल सेलोकर, अंकुश हटवार उपस्थित होते.

कोट

या सर्व प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांची माहिती ‘मोईल’ने यापूर्वी ऑनलाईन पाठवलेली होती. परंतु, नव्याने सॉफ्टवेअर पोर्टल अपग्रेट झाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. याप्रकरणी आमच्याकडून वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा सुरू आहे.

आशिष सूर्यवंशी, सहाय्यक शाखा प्रबंधक, चिखला माईन.

Web Title: Apprentice candidate deprived of examination due to negligence of officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.