जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राहणार आता शिकाऊ शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:36 PM2024-09-27T13:36:15+5:302024-09-27T13:37:21+5:30

Bhandara : सर्वांत जास्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची होईल निवड

Apprentice teachers will now be in every school in the district | जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राहणार आता शिकाऊ शिक्षक

Apprentice teachers will now be in every school in the district

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत, या योजनेची माहिती मिळाल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी अर्ज करीत आहेत.


काही शाळांमध्ये आलेल्या अर्जाची छाननी करून सर्वांत जास्त शिक्षण घेतलेल्या पात्र उमेदवारांची निवडही केली, तर काही ठिकाणी केवळ सोपस्कार पार पाडून निवडी केल्या. परंतु, या निवडीवरून गावागावांत राजकारण होत असून एकाची निवड केली तर दुसरा नाराज यामुळे गटागटाने मुख्याध्यापकांवर निशाणा साधून तक्रारी केल्या जात असल्याचे चित्र इतर जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. काही ठिकाणी गावातील राजकीय गट मुख्याध्यापकांवर दबाव टाकून निवडीसाठी शिफारस करीत आहे. त्यामुळे निवड केली किंवा नाही केली तरी आरोपाचे धनी होण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. 


मात्र, जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा दूत योजनेंतर्गत अर्ज मागविण्यापासून निवडीपर्यंतची रचना जशी आहे, तशीच ट्रेनी शिक्षकांची निवड करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी दिली. लवकरच शाळांमध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थिची निवड होणार आहे. 


स्वतंत्र निवड यादी 
भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल. पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे.


गावातील राजकारणाचा मुख्याध्यापकांना ताप 
निवड करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना दिल्यामुळे गावातील राजकारणाचा मुख्याध्यापकांना ताप येणार आहे.


निवडीचे अधिकार मुख्याध्यापकांना 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून या जागा भरत आहेत.


काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ? 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्यात येणार आहे.


शिकाऊ शिक्षक नियुक्त होणार
शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा, विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून कार्यपद्धती सुचविण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त होईल.


"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी नियमांचे पालन केले जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये एकूण ७५६ प्रशिक्षणार्थी नियुक्त होणार आहेत. ३७ प्रशिक्षणार्थी यापूर्वीच जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नियुक्त केले आहेत."
- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: Apprentice teachers will now be in every school in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.