जिल्ह्यात सहा कोटींच्या १६ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 05:00 AM2021-07-16T05:00:00+5:302021-07-16T05:00:28+5:30

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या १५ लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना मान्यता दिली होती. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावे हा या मागचा उद्देश असून जिल्ह्यात प्रत्येक घरी नळ जोडणी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू आहे. 

Approval of 16 water supply schemes worth Rs. 6 crore in the district | जिल्ह्यात सहा कोटींच्या १६ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

जिल्ह्यात सहा कोटींच्या १६ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

Next
ठळक मुद्देजल जीवन मिशन : आठ योजना सौरऊर्जेवर चालणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा योजना व प्रत्येक घरी नळ या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली. यातील आठ योजना सौरऊर्जेवर चालणार आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपवनसंरक्षक एस. एस. भलावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघमित्रा कोल्हे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विजय देशमुख, वरिष्ठ भु वैज्ञानिक शिवाजी पदमने, उपअभियंता यांत्रिकी नितीन पाटील, उपअभियंता दिनेश देवगडे, सहायक भु वैज्ञानिक व्ही. एम. मंत्री, जीवन प्राधिकारणाचे उपअभियंता डी. यू. तुरकर उपस्थित होते.
जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या १५ लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना मान्यता दिली होती. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावे हा या मागचा उद्देश असून जिल्ह्यात प्रत्येक घरी नळ जोडणी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू आहे. 
भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टरचे या बैठकीत प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या गावात होणार योजना 
- भंडारा तालुक्यातील सालेहेटी २४ लाख ९८ हजार, सीतेपर २३ लाख ९८ हजार, लाखनी तालुक्यातील गोंदी २४ लाख २१ हजार, सानगाव १५ लाख ६५ हजार, सायगाव १६ लाख ८३ हजार, पवनी तालुक्यातील चन्नेवाडा २७ लाख ३० हजार, खैरी २६ लाख ८८ हजार, सुरेबोडी २० लाख ८९ हजार, कुर्झा २४  लाख ९८, लाखांदूर तालुक्यातील आसोला ६६ लाख ९ हजार, विरली बु. ६१लाख ७० हजार, मोहाडी तालुक्यातील खडकी ८७ लाख ६६ हजार, पांजरा बोथली ४१ लाख ७६ हजार, विहिरगाव ४६ लाख १२  हजार व तुमसर तालुक्यातील मेहेगाव ६० लाख ५५ हजार आणि पांजरा योजना ३० लाख ४७ हजार किमतीच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.
७६३ गावांत प्रत्येक घरी नळ जोडणी 
- जिल्ह्यातील ७६३  गावात प्रत्येक घारी नळ जोडणी प्रस्तावित असून ३०२ गावात योजनेची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ५२ टक्के घरी नळ जोडणी देण्यात आली असून उर्वरित नळ तातडीने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Web Title: Approval of 16 water supply schemes worth Rs. 6 crore in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी