तलाव कंत्राटप्रकरणी अधिकाऱ्यांची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:07+5:302021-08-21T04:40:07+5:30
नूतन मत्स्य पालन सहकारी संस्था पापडा बुजुर्ग संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार, मासेमारी हे उदरनिर्वाहाचे एकमात्र साधन आहे. पापडा येथील तलाव ...
नूतन मत्स्य पालन सहकारी संस्था पापडा बुजुर्ग संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार, मासेमारी हे उदरनिर्वाहाचे एकमात्र साधन आहे. पापडा येथील तलाव हा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असून नियमानुसार संस्थेस तलाव ठेक्याने पूर्वीपासून होता. गतवर्षी नेहमीप्रमाणे दर पाच वर्षांनी तलाव ठेका देताना पंचायत समिती साकोली येथील कार्यकारी विस्तार अधिकारी मेश्राम यांनी हा तलाव बचत गटाला एकतर्फी दिला, जे नियमात नाही याची तक्रार संबंधित विभागाला केली. परंतु अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही, या प्रकरणावर लक्ष घालून सहकारातून रोजगार मिळावा व लघुपाटबंधारे जिल्हा परिषद भंडारा तसेच अन्य विभागाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून संस्थेला न्याय देण्याची मागणी केली आहे. तक्रारीवर मनोहर सोनवणे, माधो उंदीरवाडे, राजेश मेश्राम, गंगाधर नेवारे, नामदेव वघारे, पतिराम शहारे, कैलास मेश्राम, देवराम राऊत, सुधीर वाढई, सुभाष राऊत गावकरी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.