भातखाचरे बांधकामात मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:28 PM2019-03-04T22:28:59+5:302019-03-04T22:29:34+5:30
केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत कंत्राटदारांना मनमानी कारभार सुरु झाला आहे. टेमनी शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकामात श्ोतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याने नाराजीचा सुर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा): केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत कंत्राटदारांना मनमानी कारभार सुरु झाला आहे. टेमनी शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकामात श्ोतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याने नाराजीचा सुर आहे.
शेतकऱ्यांचे शेत शिवरात विकास कार्य करण्यासाठी केंद्र शासनाने अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत विकास कार्याची अमलंबजावणी व नियंत्रण कृषी विभागाचे ठेवण्यात आले आहे. परंतु विकास कार्य अधिकार क्षेत्रात ठेवण्यात आले नाही. शेत शिवारात कंत्राट पध्दतीने कंत्राटदाराचे मार्फत ही कामे करण्यात येत असल्याने कुणाचे ऐकूण घेण्याची त्यांची मानसिकता नाही. यामुळे कृषी विभागाची यंत्रणा हतबल झाली आहे.
या योजनेअंतर्गत करण्यात येणाºया विकास कार्यात नाराजी असली तरी असंतोषाचे खापर कृषी विभागाचे स्थानिक यंत्रणेवर फोडण्यात येत आहे. टेमनी शेतशिवारात गट क्रमांक १३ मध्ये मंडळ कृषी कार्यालय सिहोरा अंतर्गत भातखाचरे पुनर्जीवन बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. या विकास कार्यालय मंजुरी मिळाल्यानंतर थेट निविदा काढण्यात आलेल्या आहेत.
शेतकऱ्यांचे शेत शिवारात धुºयांचे बांधकाम करण्यात येत आहेत. गावात गट नं.१३ मध्ये शासनाने १ लाख १४ हजार ५३५ रुपयाचे खर्चाचे कार्यांना मंजुरी दिले आहे. निविदा अतंर्गत या कार्याचे कंत्राट देशबंधु वार्ड भंडारा येथील अंकुर विलासराव भांडारकर यांना देण्यात आले आहे. ज्या शेतकºयांचे शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकाम करण्यात येत आहे. त्या शेतकºयांना विश्वासात घेण्यात आले नाही. अंदाजपत्रक तथा फलकाचा थामपता नाही. या शिवाय धुºयाची दुरुस्ती व मातीकाम समाधानकारक नसल्याचे कृषी विभागाची यंत्रणा ओरड माजवित आहे. रोहयो अंतर्गत विकास कार्यात मोठी तफावत दिसून येत आहे. रोहयो योजनेत धुºयाचे मातीकाम मंजुराचे मार्फत करण्यात आले आहे. परंतु या योजनेत अन्य प्रातांतून ट्रक्टर मागविण्यात आले आहे. ट्रक्टरच्या सहायाने धुऱ्याचे पुनर्जीवन करतांना अनेक ठिकाणी माती खैर वैर ठेवण्यात येत आहे. धुºयाचे वर माती योग्य रितीने घालण्यात येत नाही. या धुऱ्याची उंची ३ फुट पर्यंत करण्याचे सुचना कृषी विभागाचे यंत्रणेने दिल्या आहेत. परंतु या सुचनाचे पालन करतांना कुणी दिसून येत नाही. कंत्राटदार यांचा मनमानी कारभार सुरु झाला असल्याने कृषी सहायक अडचणीत आले आहे. कंत्राटदार आणि कृषी सहायक यांच्यात साटेलोटे असल्याचे आरोप शेतकरी करित आहेत. धुरे बांधकामाची गुणवत्ता दिसून येत नसतांना कंत्राटदाराचे देयक थांबविण्यासाठी कृषी विभागाचे यंत्रणे मार्फत प्रयत्न करण्यात आले नाही. कृषी विभागाचे नियंत्रणात शेत शिवारात बंधारे आणि शेतातील कामे करण्यात येत आहेत. परंतु या बहुतांश कार्यात यंत्राचा वापर करण्यात येत असल्याने मंजुरांचे पोतवर लाथ मारण्याचा प्रकार करण्यात आल्याचा आरोप मंजुर संघटनांनी केले आहे. या संदर्भात मंडळ कृषी अधिकाºयांना संपर्क साधले असता होवू शकले नाही.
मोहाडी (खापा) पंचायत समिती क्षेत्रातील समाविष्ठ गावाचे शेत शिवारात भातखाचरे बंधारे बांधकाम करण्यात येत आहेत. या कार्यात मात्र माहिती देतांना दडपण्यात येत आहे. कंत्राटदार आणि यंत्रणेवर कारवाई झाली पाहिजे.
-विमल कानतोडे, सदस्य पंचायत समिती, तुमसर.