भंडारा येथे बाैध्द पुरातत्त्वीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:26+5:302021-02-26T04:49:26+5:30
प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय पुरातत्त्व विभाग नागपूर विद्यापीठाचे प्रवास व पर्यटन विभागाचे निर्देशक प्रा. डाॅ. प्रियदर्शी खाेब्रागडे, वसंतराव ...
प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय पुरातत्त्व विभाग नागपूर विद्यापीठाचे प्रवास व पर्यटन विभागाचे निर्देशक प्रा. डाॅ. प्रियदर्शी खाेब्रागडे, वसंतराव नाईक, शासकीय समाज विज्ञान संस्थाचे प्रा.डाॅ. आशिष शेंडे, डाॅ. अमरदीप बारसागडे उपस्थित हाेते. प्रास्ताविक प्रा. अश्ववीर गजभिये यांनी केले. डाॅ. प्रशांत साेनाेने यांनी अभ्यांगतांना चैत्य वस्तुकला व स्तूप वास्तुकला यांचा उदय व विकास कसा झाला याविषयी प्राेजेक्टरच्या माध्यमातून विशद केले. दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे पत्र्त्रा मेत्ता संघ जपान भारतचे भन्ते संघरत्न मानके प्रामुख्याने उपस्थित हाेते. अध्यक्षस्थानी दंतचिकित्सक डाॅ. महेंद्र गणवीर हाेते. यावेळी संघरत्न मानके यांच्या हस्ते कार्यशाळेतील उपस्थितांना प्रमाणपत्र व मार्गदर्शकांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. संचालन सुधेन्दू सुखदेवे यांनी तर आभार अध्यक्ष असित बागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वामन मेश्राम, पुरण लाेणारे, डाॅ. संजय वाणे, डाॅ. मधुकर रंगारी, शरद खाेब्रागडे, अमित उके, राजेश गजभिये, विनाेद बाेरकर आदींनी सहकार्य केले.