व्याघ्र प्रकल्पापेक्षा बफर, संवेदनशील क्षेत्र मोठे ?

By admin | Published: December 25, 2015 01:35 AM2015-12-25T01:35:18+5:302015-12-25T01:35:18+5:30

भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्य नवीन नागझिरा (उमरझरी वनविभाग) अभयारण्य व गोंदिया जिल्ह्यातील जुने नागझिरा तसेच जुने नवेगाव राष्ट्रीय उद्यान ....

Are buffer, sensitive area larger than Tiger project? | व्याघ्र प्रकल्पापेक्षा बफर, संवेदनशील क्षेत्र मोठे ?

व्याघ्र प्रकल्पापेक्षा बफर, संवेदनशील क्षेत्र मोठे ?

Next

गावासभोवती जंगल नसतानाही समावेश : पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्य नवीन नागझिरा (उमरझरी वनविभाग) अभयारण्य व गोंदिया जिल्ह्यातील जुने नागझिरा तसेच जुने नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव अभयारण्य ही सर्व अभयारण्ये एकत्र करून राज्य शासनाने डिसेंबर २०१३ रोजी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हा व्याघ्र प्रकल्प जाहीर केला. या व्याघ्र राखीव क्षेत्रासभोवती बफर क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. या बफर क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या गावांचे या क्षेत्रात समाविष्ट करून घेण्यासंबंधीचे सहमती पत्र घेण्याचे काम स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
बफर क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीने १० मार्च २०१५ रोजी अहवाल सादर केला. या अहवालानुसार नागझिरा, नवीन नागझिरा व नवेगावबांध या संपूर्ण क्षेत्राला समाविष्ट करणारा अभयारण्य तयार करून नागझिरा व नवेगाव या दोन्ही अभयारण्याला बफर तसेच पर्यावरण संवेदनशील क्षेत्राने जोडले आहे.
विशेष म्हणजे नागझिरा अभयारण्याची सीमा व राष्ट्रीय उद्यान नवेगाव अभयारण्याच्या सीमेमधून राष्ट्रीय महामार्ग सहा जातो. यात अनेक मोठी गावे येतात. यातील अनेक गावामध्ये जंगलही नाही. परंतु तज्ज्ञ समितीतील पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संघटनेच्या प्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून असा आराखडा तयार करावा लागला.
नागझिरा, नवेगाव व्याघ्र प्रकल्पासाठी एकूण १,२१,४८५.५९५ हेक्टर वर्गक्षेत्र बफर क्षेत्र म्हणून ठरविले आहे. त्यात एकूण ६२,०३४.३५५ हेक्टर वर्ग एवढे वनक्षेत्र आहे. एकूण ५९,४५१.२४० हेक्टर वर्ग एवढे वनेत्तर क्षेत्र आहे. या संपूर्ण क्षेत्रात भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील अनेक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील एकूण १८४ गावांचा समावेश आहे.
याचप्रमाणे नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर बफर क्षेत्रापेक्षा विस्तारीत असे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रही प्रस्तावित करण्यात आले आहे. यात एकूण १,१४,४७९.३४० वर्ग हेक्टर ऐवढे वन क्षेत्र प्रस्तावित असून एकूण ४६,७३२.६९२ वर्ग हेक्टर एवढे वनेत्तर क्षेत्र प्रस्तावित आहे. यात एकूण २२२ गावांचा समावेश आहे. पूर्व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा मात्र ६५,६३६.४८ एवढीच आहे. बफर क्षेत्र व पर्यावरण क्षेत्र यात येणाऱ्या गावाकडून या क्षेत्रात समाविष्ट होण्यासाठी तयार असल्याचे सहमतीपत्र वन विभागाकडून घेण्यात आले. अनेक गावातील ग्रामसभेत याबद्दल माहिती देण्यात आली नाही अनेक ठिकाणी सहमती पत्रे भरून घेण्यात आली. बफर व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट झाल्यामुळे या संपूर्ण क्षेत्रावर अनेक बंधने येणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Are buffer, sensitive area larger than Tiger project?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.