अर्जनविसाचा मुलगा झळकणार मराठी चित्रपटात
By admin | Published: November 4, 2016 12:58 AM2016-11-04T00:58:37+5:302016-11-04T00:58:37+5:30
मनात जिद्द आणि काम करण्याची ओढ असेल तर कोणताही कठीण कार्य सहजरित्या करता येवु शकतो...
चित्रीकरणाला सुरुवात : ‘रतन’ला अभिनयाची आवड
सिराज शेख मोहाडी
मनात जिद्द आणि काम करण्याची ओढ असेल तर कोणताही कठीण कार्य सहजरित्या करता येवु शकतो प्रयत्न केल्यास मोठ्यात मोठा शिखरही गाठता येतो हे एका सामान्य अर्जनविसाच्या मुलाने सिध्द करुन दाखविले आहे. मराठी चित्रपटात काम मिळवून.
तुमसर तहसिल कार्यालयासमोर अर्जनविसाचे काम करणारे प्रेमदास राऊत यांचा लहान मुलगा रतन राऊत याला सहनिर्मिाता शब्बीरराज यांनी आपल्या आगामी मराठी चित्रपटात ब्रेक दिला आहे. रामरतन फुलपगारे असे चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातील एक गाने नुकतेच मंगेश सावंत यांच्या आवाजात रेकार्ड केले गेले असून चित्रपटाचे चित्रीकरण रेवतडा येथे सुरु आहे. रतन राऊत याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. रितेश देशमुख त्यांचा आयडल होता. अश्यातच रतन राऊत यांची वैभव लक्ष्मीनाराण डेकाटे सोबत ओळख झाली.
वैभव डेकाटे यांनी लवमनी फील्मसच्या बॅनर खाली रामरतन फुलपगारे चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात सहनिर्माता म्हणून प्रख्यात शब्बीर राज यांचा सहभाग असून प्रमुख भुमिकेत विजय पाटकर, प्रिया बर्डे, डॉ. विलास उजवणे, नरेश बिडकर, किशोर माहाबोले, दिपज्योती नाईक हे असून नवोदित कलाकार म्हणून रजन आणि समृध्दी तसेच मंगेश आणि योगीता यांचा जोड्या आहेत. सदर चित्रपट प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करुन देईल असा विश्वास चित्रपट निर्माते वैभव डेकाटे यांनी व्यक्त केला आहे.
रामरतन फुलगारे या चित्रपटाद्वारे रतन राऊत हा ग्रामीण भागातील साधारण युवक असाधारण अशी कामगिरी करणार असून ग्रामीण भागातील युवकांचा प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
चित्रपट नगरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न अनेक तरुण तरुणी बघतात. मात्र यश त्यांनाच प्राप्त होते. ज्याच्यांत धैर्य, चिकाटी, सहनशिलता व काम करण्याची धडपड असते. हे रतन राऊत याने सिध्द करुन दाखविले आहे.