शासनाच्या मदतीवर आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:42 PM2017-10-31T23:42:13+5:302017-10-31T23:42:35+5:30
परतीचा पाऊस व अनियंत्रित किडीने धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : परतीचा पाऊस व अनियंत्रित किडीने धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेले धानपिक निसर्गाच्या अवकृपेमुळे बाधित होण्याची चिन्हे आहेत. परिणामी शेतकºयांवर पुन्हा संकट कोसळले आहे. बळीराजाची मानसिकता खचत असून अशा संकटप्रसंगी शासनाने कर्तव्यतत्परता दाखवित नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देणे गरजेचे झाले आहे.
ना.राजकुमार बडोले यांनी स्वत: पालांदूर परिसरातील शेतशिवारताील स्थिती बघितली आहे. त्यांनी मचारणा येथे शेतकºयांना आश्वस्थ केले असून अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
धान कापणीला दुप्पट खर्च येत आहे. पण नफा तोटा न बघता हंगाम जोमात सुरू आहे. धानाच्या उत्पादन खर्च वाढतच असून त्या तुलनेत हमीभाव वाढ केवळ ८० रूपये एवढाच देत बोनस किंवा प्रोत्साहन राशी जाहिर न केल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. पिकविमा काढला असून संबंधित कंपनीचे प्रतिनिधी अजुनही फिरकले नाही.
बरेच शेतकºयांनी नुकसान भरपाई करीता बँकेमार्फत विमा कंपनीला अर्ज संपूर्ण माहितीसह सादर केले आहेत. मात्र यंत्रणा अद्यावत नसल्याने शेतकºयांना काही मिळेल ही आशा धुसर होत आहे.
लोकप्रतीनिधी व शासन शेतकºयांनी सकारात्मक पाठवित नसल्याने शेतकरी सुमार संकटात आला आहे. पर्णकोष, तुडतुडा रोगाने धानपिकाला आपल्याच घशात रिचविले आहे. मागील दोन वर्षापासून धानाला अंतिम टप्प्यात असताना संसर्गजन्य रोगाप्रमाणे हे रोग वाढत आहेत. अभ्यासक या विषयात विविध उपाय सांगतात पण विज्ञान कितीही पुढे गेले खरे पण निसर्गाने मात्र आपला प्रथम क्रमांक ठेवला हे खरे.