भंडाऱ्यात पाण्यासाठी आक्रोश मोर्चाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:21 PM2018-09-22T22:21:37+5:302018-09-22T22:21:57+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यासंदर्भात नगर सेवक नितीन धकाते यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. सोमवारपर्यंत समस्येवर योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर २६ सप्टेंबरला नगरपरिषदेवर प्रभागातील महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक धकाते यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यासंदर्भात नगर सेवक नितीन धकाते यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. सोमवारपर्यंत समस्येवर योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर २६ सप्टेंबरला नगरपरिषदेवर प्रभागातील महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक धकाते यांनी दिला आहे.
बारमाही वाहणाºया वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या भंडारा शहरात पाण्याची समस्या आहे असे सांगितल्यास कोणालाही आश्चर्य वाटेल. हे येथील नगर परिषद प्रशासनाने खरे करुन दाखविले आहे. पावसाचे दिवस असल्याने तसेच गोसे धरणात पाणी अडविल्यामुळे नदी तुडुंब भरून वाहत आहेत. परंतु नगर परिषदेचे ढिसाळ कारभाराने शहरातील अनेक वॉर्डात उन्हाळ्यात जाणवेल अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कुलरचा वापर होते त्यामुळे पाण्याचा वापरही कित्येक पटीने वाढतो. त्यामुळे नगर प्रशासन पाणी वाटप करण्यात कमी पडतो. परंतु पावसाचे दिवस त्यातच नदी तुडुंब भरलेली हे अतिशोक्ती ठरेल.
प्रभाग १४ मध्ये हाताबोटावर आणून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ते खाजगी नळ घेऊ शकत नाही. या वॉर्डात सार्वजनिक नळ हे बोटावर मोजण्या इतके आहेत. येथील अनेक नळावर दुगंर्धीयुक्त पाणी वाहत असते. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे. नगर प्रशासनाकडून केवळ १० ते १५ मिनिट पाणी सोडण्यात येते त्यातच नळांना येणाºया पाणीच्या धार कमी असते. कुणाला २ गुंड तर कुणाला थेंबभरही पाणी मिळत नाही.
अश्या अनेक समस्या लक्षात घेऊन प्रभागाचे नगर सेवक नितीन धकाते यांनी नगर परिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेला अंतिम स्वरूपात येण्यासाठी अजून बराच वेड बाकी आहे तो पर्यंत लोकांना बिना पाण्यानी ठेवणार काय? असा सवाल नितीन धकाते यांनी प्रशासनाला विचारला आहे. जनतेला कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि त्या साठी जर सोमवार पर्यंत या प्रश्नावर उपाय करण्यात आले नाही तर बुधवारला प्रभागातील महिलांचा आक्रोश मोर्चा नगर परिषद प्रशासना विरुद्ध काढला जाईल असे नगरसेवक नितीन धकाते यांनी सांगितले आहे.