नदीत रपटा तयार करून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:41 AM2021-03-01T04:41:47+5:302021-03-01T04:41:47+5:30
ही बाब लक्षात घेत नागरिकांच्या तक्रारीवरून आ. राजू कारेमोरे यांनी प्रत्यक्ष पुलाची पाहणी करण्यासाठी भेट दिली. यावेळी नदीत रपटा ...
ही बाब लक्षात घेत नागरिकांच्या तक्रारीवरून आ. राजू कारेमोरे यांनी प्रत्यक्ष पुलाची पाहणी करण्यासाठी भेट दिली. यावेळी नदीत रपटा तयार करून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. काही दिवसांपूर्वी हा पूल जड, मध्यम आणि हलके वाहनांसाठी वाहतुकीस योग्य नसल्याच्या कारणावरून सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता.
पूल बंद असल्याने रुग्ण आणि अन्य नागरिकांची चांगलीच तारांबळ होत आहे. आमदारांनी आपल्या भेटीत वास्तविकता जाणून घेतली असता बैलगाडी, दुचाकी आणि सायकलस्वारासाठी पूल चालू ठेवण्यास कसलीही हरकत नसल्याचे निर्देशनास आले तसेच जड वाहनांसाठी तात्काळ नदीपात्रात रपटा तयार करून वाहतुकीची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.