वृक्ष लागवडीसह संगोपणाचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:11 AM2019-06-15T00:11:26+5:302019-06-15T00:15:04+5:30

३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या .

Arrange rides with tree plantation | वृक्ष लागवडीसह संगोपणाचे नियोजन करा

वृक्ष लागवडीसह संगोपणाचे नियोजन करा

Next
ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : भंडारा व पवनी तालुका स्थायी समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या .
भंडारा व पवनी तालुका स्थायी समितीच्या सभेत ते बोलत होते. या सभेला सहायक वनसरंक्षक आर. डी. चोपकर, तहसिलदार, अक्षय पोयाम, भंडाराच्या गटविकास अधिकारी नुतन सावंत, पवनीचे गटविकास अधिकारी तेलंग, भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे, पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, पवनीचे सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. धोटे, भंडारा सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा चव्हाण, तसेच अशासकीय संस्था प्रतिनिधींमध्ये शाहीद खान, पंकज देशमुख व इतर प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वृक्षलागवड व संगोपण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असावा, यासंदर्भात शासन निर्णय ४ जुन २०१९ ला जारी करण्यात आला. त्यानुषंगाने भंडारा व पवनी तालुकास्तरावर आमदार रामचंद्र अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती नेमण्यात आली. सदर समिती वृक्ष लागवड व संगोपण कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रशासकीय विभागांना दिलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करणे, वृक्ष लागवडीची लॅड बॅक तयार करणे, उंच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, शासनाने ठरविलेल्या कालमर्यादेनुसार खड्डे तयार करणे, झाडांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहण्यासाठी उपाययोजना करणे आदींसाठी कार्य करणार आहे. त्यानुषंगाने समितीची सभा १३ जुनला पंचायत समिती सभागृह, भंडारा येथे घेण्यात आली.
वातावरण, ऋतू आणि हवामान बदल यांची तीव्रता आणि दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत हरित महाराष्ट्र प्रकल्पांची अंमलबजाणी सन २०१६ पासून संपूर्ण राज्यात सुरु आहे. राज्यातील जैवविविधतेचे सरंक्षण, संवर्धनाबरोबरच पर्यावरणाची सुरक्षितता राखण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनपरिक्षेत्र व वृक्षाच्छादन असणे गरजेचे आहे. राज्याचे वनपरिक्षेत्र आणि वृक्ष आवरण सध्याच्या २० टक्केवरुन ३३ टक्केवर नेण्यासाठी वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम सातत्यपुर्ण रितीने राबविणे गरजेचे आहे.
सन २०१९ च्या पावसाळ्यातील ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्याकरीता ५३.९९ लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवून विभाग देण्यात आले आहे. याकरीता वनविभाग सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, इतर विभाग तसेच ग्रापंचायतींचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग आहे. वृक्षलागवड सोबतच त्यांचे संगोपण करण्याकरीता सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सदर

Web Title: Arrange rides with tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.