कलावंतांच्या उत्थानासाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:44 AM2021-09-16T04:44:08+5:302021-09-16T04:44:08+5:30
भंडारा जिल्हा हा झाडीपट्टीतील कलावंताचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात तमाशा, गोंधळ, भारुड, दंडार, नाटक, लावणी, ...
भंडारा जिल्हा हा झाडीपट्टीतील कलावंताचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात तमाशा, गोंधळ, भारुड, दंडार, नाटक, लावणी, भजनी मंडळ, कव्वाली यांसारख्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले जाते. समाजप्रबोधन करणारे अनेक कलाकार दिव्यांग असून वृद्ध आहेत. अशा कलावंतांना शासन काही अंशी शासकीय निधीतून मदत करीत आहे. परंतु कलावंतासाठी स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे कलावंतापर्यत शासनाच्या अनेक योजना पोहचत नाही. कलावंत शासकीय योजनेपासून वंचित राहतो. वृध्द कलावंताला जे शासनाकडून मानधन मिळतो त्यापासून जिल्ह्यातून अनेक कलावंत स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे आताही वंचित आहेत. मानधनाचा कारभार हा जिल्हा समाजकल्याण विभागाकडे असल्यामुळे अनेक तांत्रिक बाबींच्या अडचणीला सामोरे जावे लागते. या विभागात पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे व अन्य सामाजिक बाबींच्या उत्थानाचा कार्यभार असल्यामुळे येथे कलावंताच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. दिव्यांग कलावंतांनाही मानसिक तनाव येऊन ते जिल्हा परिषदेच्या पुढे येऊन मनस्ताप व्यक्त करताना आढळून आले आहेत. शिष्टमंडळात इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत देशकर, कलावंतांचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष लोकशाहीर शिवदास वाहाणे, लोकशाहीर सवितराव गजभिये, लोकशाहीर प्रकाश नाकतोडे, तबला मास्टर लिलाधर भोवते, कलावंतांचे जिल्हा सचिव आनंदराव कायरकर, प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानच्या जिल्हा संघटिका कुंदा भदाडे, गीतांजली घरडे, स्नेहा भोवते, सुनील काहालकर, रामचंद निर्वाण, मेहमूद खान, शेख नवाब, सुरेश गोन्नाडे आदी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.