पंप चालण्याकरिता सौर ऊर्जेची व्यवस्था करणार

By admin | Published: November 15, 2016 12:32 AM2016-11-15T00:32:06+5:302016-11-15T00:32:06+5:30

सरपंच लिचडे यांनी वीज समस्येमुळे तीनचार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही,..

Arrange solar energy for running the pump | पंप चालण्याकरिता सौर ऊर्जेची व्यवस्था करणार

पंप चालण्याकरिता सौर ऊर्जेची व्यवस्था करणार

Next

दिलीप बंसोड : बरबसपुरा येथे स्ट्रीट लाईट व लावणीचे उद्घाटन
काचेवानी : सरपंच लिचडे यांनी वीज समस्येमुळे तीनचार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, अशी समस्या मांडत सौर ऊर्जेची व्यवस्था अदानी फाऊंडेशनने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. यावर ही मागणी अदानी व्यवस्थापनाशी बोलून लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन माजी आ. बन्सोड म्हणाले.
बसबसपुरा येथे तिसऱ्या मंडईनिमित्त जय बजरंग नाट्य मंडळाद्वारे लावणी कार्यक्रम घेण्यात आले. लावणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या हस्ते, धनवर्षा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. रंगमंच पूजन अदानी फाऊंडेशनचे नितीन शिरवाडकर यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून पं.स. सदस्य संध्या गजभिये, तंमुसचे अध्यक्ष मंसाराम उईके, साहेबराव रिनाईत, सरपंच ममता लिचडे, उपसरपंच डी.पी. रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य नरेश असाटी, नेतराम माने, तेजराम चौधरी, दिलीप मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक सरपंच ममता लिचडे यांनी केले. त्यांनी गावातील वीज समस्या व पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी अदानी पॉवरने सौर ऊजेची मदत करावी, अशी मागणी केली. पं.स. सदस्य संध्या गजभिये यांनी, महिलांनी कोणत्याही सभेत पुढाकार घेवून विकासकार्यात सहभागी व्हावे. महिलांनी गटांमार्फत लघू उद्योगाकडे भर द्यावे, असे त्या म्हणाल्या. तर अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिरवाडकर यांनी, बरबसपुरा गावा विसरले नसून ज्या समस्या सोडविता येतील, त्या सोडवू, असे आश्वासन दिले. गुमाधावडा येथे मशरूम उद्योग महिलांनी सुरू केला. तसा सर्व महिलांनी लघू उद्योग करून कुटुंबास आर्थिक बळकटी देण्याचा सल्ला दिला.धनवर्षा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश कटरे यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमाने कलेचे महत्व सांगितले. आरोग्य व आर्थिक बाबींवरही त्यांनी मार्गदर्शन केले. माजी आ. दिलीप बन्सोड यांनी बरबसपुरा गावाच्या विकासासाठी सरपंच ममता लिचडे व सहकाऱ्यांची प्रसंशा केली. आपण वेळोवेळी सहकार्य केले व करत राहू, असे सांगितले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमाने घरी लघुद्योग करावा. आरोग्य उत्कृष्ट ठेवण्याकरिता मनोरंजन आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय व नियमित विद्युत पुरवठा आवश्यक आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Arrange solar energy for running the pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.