आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा

By admin | Published: July 14, 2016 12:37 AM2016-07-14T00:37:26+5:302016-07-14T00:37:26+5:30

आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणा आंदोलन करण्यात आले.

Arrest Ambedkar Bhavan's commanders | आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा

Next

महाधरणा आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले.
आंबेडकर भवन हे आंबेडकारी चळवळीचे केंद्रस्थान असुन चळवळीचे प्रेरणास्थान आहे. त्या भवनाला जमीनदोस्त करणे म्हणजे आंबेडकरी चळवळ नष्ट करण्याचा डाव आहे. हे घातकी व समाजद्रोही कृत्य करणारे रत्नाकर गायकवाड व त्यांच्या माणसांनी अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली. आंदोलनात रिपब्लिकन सेना, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. भाषणातून अटक करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात हरिशचंद्र रामटेके, तुळशीराम गेडाम, अचल मेश्राम, हिवराज उके, समिक्षक बौध्दप्रिय, ताराचंद नंदागवळी, भिमशंकर गजभिये, प्रेमलाल टेंभुरकर, डॉ. भैय्यालाल गजभिये, पुरुषोत्तम रामटेके, हरिदास मेश्राम, हरिदास रामटेके, रंजित कोल्हटकर, प्राणहंस मेश्राम, हरकर उके, गरिबदास टेंभेकर, अ‍ॅड. पदमाकर टेंभुर्णे, रवि खोब्रागडे, एन. एस. खोब्रागडे, पी. ए. कोटांगले, सत्यवान भिवगडे, सिध्दार्थ मेश्राम, प्रफुल देशभ्रतार, डॉ. विनोद भोयर, चंद्रबोधी मेश्राम, सिमा बडोले, रंजना अनिल मेश्राम, जनार्धन सुखदेवे, राधेश्याम कावळे, धनपाल गडपायले, वामनराव तिरपुडे, राहुल बडोले, वर्षा मून, कविता पाटील, शालीकराम बागडे, प्रफुल्ल देशभ्रतार, गणपाल मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Arrest Ambedkar Bhavan's commanders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.