इमारत बांधकाम साहित्य चोरणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:15 AM2019-09-17T00:15:07+5:302019-09-17T00:15:49+5:30
इमारत बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणाºया टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा परीषद चौक येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली. सुरेश माणिक जिभकाटे (२९) रा. चिचोली (मौदा, नागपूर), श्रीकांत ईस्तारी चव्हाण (२७) रा. मारेगाव (भंडारा), सोनू रामदास रोडगे (३२) रा. चिचोली(धानला, मौदा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : इमारत बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणाºया टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा परीषद चौक येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली.
सुरेश माणिक जिभकाटे (२९) रा. चिचोली (मौदा, नागपूर), श्रीकांत ईस्तारी चव्हाण (२७) रा. मारेगाव (भंडारा), सोनू रामदास रोडगे (३२) रा. चिचोली(धानला, मौदा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी सुरेश व श्रीकांत हे दोघेही बेला येथील नवनिर्मित घराचे बांधकामात उपयोग होत असलेल्या लोखंडी सेंट्रीगचे प्लेटा चोरून विक्रीसाठी दुचाकी क्र. एम. एच. ४० बी. डब्लू. ०५७१, एम. एच. ४० बी. डब्लू. ५३७६ ने त्यांचा साथीदार सोनू रोडगे त्यांच्या पाठोपाठ येत असताना आढळून आला. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेल सात लोखंडी सेंट्रींग प्लेट व दुचाकी असा एकूण १ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रविंद्र मानकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उईके, पोलिस नायक विजय तायडे, निरंजन कढव, किशोर मेश्राम, राधेश्याम ठवकर, अमोल खराबे, पोलिस शिपाई चेतन पोटे यांनी केली.