साकोलीतील चोरी प्रकरणात एका अट्टल गुन्हेगारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:39 AM2021-09-06T04:39:31+5:302021-09-06T04:39:31+5:30
साकोली येथे झालेल्या चोरी प्रकरणात सहभागी असल्याचे निदर्शनास येताच मोबाइल लोकेशनच्या आधारावर त्याला अटक केली आहे. पोलिसांनी कार ...
साकोली येथे झालेल्या चोरी प्रकरणात सहभागी असल्याचे निदर्शनास येताच मोबाइल लोकेशनच्या आधारावर त्याला अटक केली आहे. पोलिसांनी कार क्रमांक एम. एच .३२ वाय. ३७९५ ही जप्त केलेली आहे. जप्त केलेल्या कारमध्ये एम एच ३२- ए एच -३९३७,एम एच ३२ वाय४३८७,एम एच ४६ बी व्ही २८१०, अशा अवैध वेगवेगळ्या नंबर प्लेट आढळून आली आहे. टोळी ही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. दुधानी याच्यावर सन २००२, २००४ व २०१२ मध्ये ठाणे कर्नाटक व अन्य ठिकाणी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. चोरीमध्ये सामील असलेले सहभागी आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या शोध घेत आहे. साकोली पोलिसांनी मंगलसिंग दुधानी याविरुद्ध ४५७, ३८०, भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करून वर्धा पोलिसांकडून आपल्या ताब्यात घेतले. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वायकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खोकले व संदीप भगत, प्रशांत गुरव, स्नेहदीप टेंभुर्णे करीत आहेत.
बॉक्स
अन्य चोरीचीही कबुली
साकोलीत ५ ऑगस्टच्या मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील खेडीकर ज्वेलर्स, पुष्पम ज्वेलर्स, सुमन डेअरी व पिंपळगाव सडक येथील रोकडे ज्वेलर्समध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरी प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारावर आरोपी वीरमंगल सिंग उर्फ डॉनसिंग मायासिंह दुधानी (४७) (बिजापूर रा.कर्नाटक )सध्या रा. झरी, जि. परभणी यास अटक केली आहे. या टोळीने वर्धा जिल्ह्यासह नागपूर व भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पिंपळगाव सडक व साकोली येथे सराफा दुकाने व इतर व्यावसायिक दुकानांमध्ये चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने जवाहर नगर पिंपळगाव मौदा येथील केलेल्या चोरीची कबुली दिली आहे.