गोसेखुर्द धरणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

By admin | Published: January 19, 2017 12:26 AM2017-01-19T00:26:28+5:302017-01-19T00:26:28+5:30

कडाक्याची थंडी सुरु असल्यामुळे थंडीच्या प्रदेशातून हिवाळ्याच्या दिवसात विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणावर स्थलांतरीत पक्षी पाहुणे म्हणून आले आहेत.

Arrival of migratory birds in Gosekhurd dam | गोसेखुर्द धरणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

गोसेखुर्द धरणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

Next

पर्यटकांची रेलचेल : उद्योग निर्माण झाल्यास रोजगारालाही वाव
पवनी : कडाक्याची थंडी सुरु असल्यामुळे थंडीच्या प्रदेशातून हिवाळ्याच्या दिवसात विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणावर स्थलांतरीत पक्षी पाहुणे म्हणून आले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसोबतच पक्षी मित्राणाही एक पर्वणीच ठरली आहे.
विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण तयार होवून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होवून जिकडे तिकडे चारही बाजूने अथांग पाणी पसरले आहे. त्यामुळे येथे पक्षांना वास्तव्य करणे सोईचे ठरले आहे. येथे पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात आपली घरटी बांधली आहेत. तीन वर्षापासून येथे थंड प्रदेश सायबेरीया, मंगोलिया, लडाख, चिन, तायवान आदी देशातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येत आहेत. मागील वर्षी येथे हिवाळ्यात स्पाूट बिल्ड डक या स्थलांतरित पक्षाच्या थव्यासोबतच बहुसंख्य स्थलांतरित पक्षी येथे आढळून आले होते. कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येथे आले आहेत.
हे पक्षी गोसीखुर्द धरणाच्या खालच्या निथड भागात घाटउमरीच्या व थुटानबोरीच्या बाजूने असलेल्या धरणाच्या पाण्यात जलविहार करताना आढळून आले आहे. स्पॉट बिल्ड डक या स्थलांतरित पक्षांचे थवे यावर्षीही आले आहेत.
गोसीखुर्द धरण विदर्भातील चांगले पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात येणारे स्थलांरित पक्षी वाटल्यास गोसीखुर्द धरण पक्षी मित्रांसाठी अभ्यासाचे ठिकाण ठरणार आहे. पण त्याकरिता या पक्ष्यांच्या शिकारीवर कडक निर्बध आणून या पक्ष्यांना वाचविणे महत्वाचे आहे. त्यामुळे या पक्षांना स्वच्छ जलविहार करता येईल. त्यामुळे पुढच्या वर्षी येणाऱ्या स्थलांतरित पक्षांच्या संख्येत वाढ होईल.
धरणाच्या खालच्या निथड भागात मासेमारी केली जात असल्यामुळे या स्थलांतरित पक्षांना जलविहार करताना अडथळे येत आहेत. अनेक वेळा या पक्षांचे पाय जाळ्यात अडकल्याचे आढळून आले आहे. गोसीखुर्द धरणासोबतच वाही जलाशय, वैनगंगा नदी आदी ठिकाणीही स्थलांतरित पक्षी आले आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Arrival of migratory birds in Gosekhurd dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.