विदर्भात अवकाळी पावसाचे गारांसह आगमन; कापणीच्या धानाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:52 PM2020-04-27T17:52:30+5:302020-04-27T17:53:59+5:30
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यांमध्ये आज सोमवारला तीन वाजेपासून वातावरणात बदल घडून सायंकाळी सहा च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यांमध्ये आज सोमवारला तीन वाजेपासून वातावरणात बदल घडून सायंकाळी सहा च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
शेत शिवारात असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना एकच धावपळ करीत घर गाठावे लागले. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे . भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका नक्कीच सहन करावा लागणार आहे .
कापणीला आलेले धान जमीनदोस्त होण्याची भीती वाटत आहे.
वर्धा जिल्ह्यात हमदापूर आणि शिवारात सोमवारला अकस्मात वादळासह पाऊस आणि गारपीट झाल्याने हमदापूर आणि रज्जकपूर येथे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळपासून ऊन तापत असताना दुपारी २.१५ ते २.४५ च्या सुमारास जोरदार हवा सुरू होऊन जोराचा गारासह पाऊस सुरू झाला. यात राजनगीरी महाराज मंदिराची भित पडली. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील मोठे झाड पडल्याने वीज तारा तुटल्या. युवराज नगराळे यांच्या शेतातील सौरऊजार्चे पँनल कोसळले.तसचे रज्जकपूर पारधी बेड्यावरील दिनेश पवार,गुड्डू भोसले, विशाल पवार यांच्या घरावरील टिना उडाल्या. यात जीवित हानी झाली नाही अशी माहिती पोलीस पाटील अतुल कांबळे यांनी दिली.
कोरोनाच्या संकटाने सर्वच हवालदिल झाले असताना यात भर पडली ती नैसर्गिक संकटाची. शासनाने गाव खेड्यातील समस्येकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.