कला मनुष्याला जिवंत ठेवण्याचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:34 AM2017-12-25T00:34:59+5:302017-12-25T00:35:13+5:30

भविष्यकाळ हे भयंकर आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये कलेचा गुण पेरा. यात शाहिरी असो वा झाडीबोलीतील दंडार, खडी गंमत, भारुड असे नाविन्य वर्तमान काळातील परिवर्तनातील घडामोडींचे अंतर्भाव असावा.

Art to keep a man alive | कला मनुष्याला जिवंत ठेवण्याचे साहित्य

कला मनुष्याला जिवंत ठेवण्याचे साहित्य

Next
ठळक मुद्देशाहिर दादा पासलकर : झाडीबोली साहित्य संमेलनाचे वाजले सुप

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भविष्यकाळ हे भयंकर आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये कलेचा गुण पेरा. यात शाहिरी असो वा झाडीबोलीतील दंडार, खडी गंमत, भारुड असे नाविन्य वर्तमान काळातील परिवर्तनातील घडामोडींचे अंतर्भाव असावा. कलेल्या सानिध्यात राहल्याने मानवाला नवजीवन, नवसंजीवनी मिळते. परिणामी कला मनुष्याला जिवंत ठेवण्याचे उत्तम साहित्य आहे. असे प्रतिपादन महाराष्टÑ शाहिर परिषद पुणेचे अध्यक्ष शाहिर दादा पासलकर यांनी केले.
तुलसी बहुउद्देशिय शिक्षण संस्था महात्मा गांधी अभ्यास केंद्र व झाडीबोली साहित्य मंडळ साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. घनश्याम डोंगरे, साहित्य नगरी, पेट्रोलपंप जवाहरनगर येथे समारोपीय मुख्य अतिथी म्हणून शाहिर दादा पासलकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर हे होते. यावेळी ज्येष्ठ लोककलावंत व साहित्यीक विजय जगताप, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभरे (गडचिरोली) झाडीबोली साहित्य मंडळ शाखा साकोलीचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष महेश टेंभरे, हिरामन लंजे, मधुकर नंदनवार, राम महाजन उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मधुकर नंदनवार लिखीत भंडारा जिल्ह्यातील लोकनाट्य दंडार या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यापिठ उन्हाळी २०१७ परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना परितोषीक देण्यात आले. यात नेहा सेलोकर (बीए), अर्चना ढोबळे (बीकॉम), जयंत पडोळे (बीबीए), किर्ती राहुल (एमए) सीता बाग, योगिता खोब्रागडे, पुजा गेडाम, राखी पाल, सुषमा रुद्रकार, अक्षय बागडे यांचा समावेश आहे.
तत्पूर्वी सकाळी ‘माझी पहिली पुस्तक’ या विषयावर डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आले. यात सहभागी वासुदेव रार्घोते (नागपूर) चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली), इंद्रकला बोपचे (आमगाव), विजय मेश्राम (गोंदिया) यांचा समावेश होता.
संचालन डॉ. अनिता वंजारी यांनी तर आभार गजानन कोर्तलाकर यांनी केले. तद्नंतर दंडारमहर्षी रघुनाथ बोरकर यांच्या चळवळीने मला काय दिले, या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. सदर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कवयित्री अंजणाबाई खुणे या होत्या. अंजनाबाई खुणे यांनी सादर केलेली कविता ही हिरामण लंजे या भावाला आवतन म्हणून अर्पण केली, असे सांगितले.
र.स. गि-हेपुंजे मांडो अंतर्गत असी माझी शाखा या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी लखनसिंह कटरे हे होते. संचालन डॉ. रामलाल चौधरी आभार राजेंद्र घोटकर यांनी केले.

Web Title: Art to keep a man alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.