वीज कर्मचाऱ्यांतर्फे कलापथक व सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:40+5:302021-03-24T04:33:40+5:30
विदुयत उपकेंद्र अडयाळ येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलापथकद्वारे वीज वितरण कंपनीचे धोरण सोप्या भाषेत उपस्थितांना ...
विदुयत उपकेंद्र अडयाळ येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलापथकद्वारे वीज वितरण कंपनीचे धोरण सोप्या भाषेत उपस्थितांना समजविण्यात आले. उपस्थित विद्युत कर्मचारी व ग्रामस्थांची ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथील चम्मू द्वारा कोरोना चाचणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ‘एजी’ पॉलीसीचे जे धोरण स्वीकारले आहे, ते सर्वांपर्यंत पोहचविणे या आयोजन मागचे दोन मुख्य उद्देश आहेत. त्या निमित्ताने विद्युत ग्राहकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्र विज वितरण कंपनी ग्राहकांना काय काय सेवा देणार आहे याची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक ग्राहकांना व्हावी हा यामागचा हेतू असल्याचे तसेेेच
शेतकऱ्यांच्या शेतपंपाला तात्काळ वीज कनेक्शन, जी थकबाकी आहे त्यात कनशेषण, शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा साठी सतत प्रयत्न आणि कृषीपंपाला पुढे चालून दिवसाही वीज मिळेल अशी माहिती
या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ सुखदेव शेरकर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी संदीप कदम,मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ सुखदेव शेरकर, अधीक्षक अभियंता भंडारा मंडळ राजेश नाईक, कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड भंडारा विभाग, उपकार्यकारी अभियंता पवनी प्रदीप भोयर,तहसीलदार पवणी नीलिमा रंगारी,माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार,ठाणेदार सुशांत पाटील,सरपंच जयश्री कुंभलकर, सहाय्यक अभियंता वीज वितरण उपकेंद्र अडयाळ अनुराग गजभिये
या वेळी वीज महावितरण चे अधिकारी कर्मचारी तथा ग्रामवासी उपस्थित होते