वीज कर्मचाऱ्यांतर्फे कलापथक व सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:35 AM2021-03-26T04:35:15+5:302021-03-26T04:35:15+5:30

अड्याळ : देशाच्या विकासासाठी सध्याच्या परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण आणणे आणि नियम पाळणे दोन्ही महत्त्वाचे आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, ...

Art troupe and bicycle rally by power workers | वीज कर्मचाऱ्यांतर्फे कलापथक व सायकल रॅली

वीज कर्मचाऱ्यांतर्फे कलापथक व सायकल रॅली

Next

अड्याळ : देशाच्या विकासासाठी सध्याच्या परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण आणणे आणि नियम पाळणे दोन्ही महत्त्वाचे आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे मत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी व्यक्त केले. येथील वीज वितरण कंपनीतर्फे कलापथक व सायकल रॅली काढून कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली. पोलीस स्टेशन अड्याळ येथून सायकल रॅलीला सरपंच जयश्री कुंभलकर, पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.

विद्युत उपकेंद्र अड्याळ येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कलापथकाद्वारे वीज वितरण कंपनीचे धोरण सोप्या भाषेत उपस्थितांना समजविण्यात आले. उपस्थित विद्युत कर्मचारी व ग्रामस्थांची ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथील चमूद्वारा कोरोना चाचणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ‘एजी’ पॉलिसीचे जे धोरण स्वीकारले आहे, ते सर्वांपर्यंत पोहचविणे या आयोजनामागचे दोन मुख्य उद्देश आहेत. त्यानिमित्ताने विद्युत ग्राहकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्र वीज वितरण कंपनी ग्राहकांना काय काय सेवा देणार आहे याची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक ग्राहकाला व्हावी हा यामागचा हेतू असल्याचे तसेेेच शेतकऱ्यांच्या शेतपंपाला तत्काळ वीज कनेक्शन, जी थकबाकी आहे त्यात सवलत, शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा यासाठी सतत प्रयत्न आणि कृषीपंपाला पुढे दिवसाही वीज मिळेल, अशी माहिती या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ सुखदेव शेरकर यांनी दिली आहे.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ सुखदेव शेरकर, अधीक्षक अभियंता भंडारा मंडळ राजेश नाईक, कार्यकारी अभियंता भंडारा विभाग नीलेश गायकवाड, उपकार्यकारी अभियंता पवनी प्रदीप भोयर, तहसीलदार पवनी नीलिमा रंगारी, माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार, ठाणेदार सुशांत पाटील, सरपंच जयश्री कुंभलकर, साहाय्यक अभियंता वीज वितरण उपकेंद्र अड्याळ अनुराग गजभिये, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तथा ग्रामवासी उपस्थित होते.

Web Title: Art troupe and bicycle rally by power workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.