मोहाडीत युरिया खताची कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:26+5:30

मोहाडी तालुक्यात अनेक खेतकरी रबी हंगामात गव्हाचे पीक घेतात. सध्या गव्हाच्या लागवडीला वेग आला आहे. शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जावून युरियाबाबत विचारणा करतात. परंतु युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे.

Artificial scarcity of urea fertilizer in Mohadi | मोहाडीत युरिया खताची कृत्रिम टंचाई

मोहाडीत युरिया खताची कृत्रिम टंचाई

googlenewsNext
ठळक मुद्देचढ्या दराने विक्री : कृषी केंद्रावर कारवाई करण्याची शेतकऱ्यांचंी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : रबी हंगामासाठी शेतकरी विविध रासायनिक खतांची खरेदी करीत असताना गत काही दिवसांपासून तालुक्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे काही विक्रेते चढ्या दराने खताची विक्री करीत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असून संबंधित विभागावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मोहाडी तालुक्यात अनेक खेतकरी रबी हंगामात गव्हाचे पीक घेतात. सध्या गव्हाच्या लागवडीला वेग आला आहे. शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जावून युरियाबाबत विचारणा करतात. परंतु युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देतात. खताच्या किंमतीबाबत शेतकऱ्याने वाद घातला तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव चढ्या दरात युरिया खरेदी करावा लागतो.
विशेष म्हणजे प्रत्येक हंगामातच काही कृषी विक्रेते युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर त्याची चढ्या भावाने विक्री करतात. यातून शेतकºयांची मोठी आर्थिक लुट होत आहे.
या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू शेख, पुरूषोत्तम पात्रे यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. कृषी विभागाने याप्रकरणी दखल घेऊन काळा बाजार करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विक्रेते करतात लिंकिंग
युरिया विकत घेताना काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना इतर खते किंवा किटकनाशक विकत घेण्याची शक्ती करतात. इतर खते अथवा किटकनाशक खरेदी केले तरच युरिया देतात. शेतकऱ्यांना केवळ युरियाची गरज असते. मात्र नाईलाजाने शेतकऱ्यांना युरियासोबत इतर उत्पादन विकत घ्यावे लागते. कृषी केंद्र चालकांच्या या लिंकींगवर कुणाचाही अंकुश नाही.

तालुक्यात युरियाचा कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याची अथवा अधिक दराने विक्री होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल. कोणत्याही शेतकऱ्यांने अधिक किंमत देऊन युरिया खरेदी करू नये.
-रविंद्र वंजारी, कृषी विस्तार अधिकारी, मोहाडी.

Web Title: Artificial scarcity of urea fertilizer in Mohadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती