कलात्मक अविष्कार म्हणजे लोककला
By admin | Published: November 29, 2015 01:39 AM2015-11-29T01:39:49+5:302015-11-29T01:39:49+5:30
महाराष्ट्रातील लोककलेला मोठी अशी परंपरा लाभलेली आहे. लोककलेत अनेक कलांचा समावेश असून ...
संजयकुमार माटे यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय युवा महोत्सव
भंडारा : महाराष्ट्रातील लोककलेला मोठी अशी परंपरा लाभलेली आहे. लोककलेत अनेक कलांचा समावेश असून युवा महोत्सवानिमित्त नव्या दमाच्या, नव्या पिढीच्या उमद्या व आश्वासक कलाकारांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देवून अभिनय कौशल्य व तंत्रज्ञान साध्य करण्यास उत्तम संधी प्राप्त झालेली आहे. खरं तर कलात्मक आविष्कार म्हणत लोककला आहे असे प्रतिपादन संजयकुमार माटे, जिल्हा समन्वयक नेहरु युवा केंद्र भंडारा यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा यांचे विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. २६ ते २७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये पोलीस कल्याण बहुउद्देशिय सभागृह, भंडारा येथे करण्यात आले होते. सदर महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत, शास्त्रीय गायन, शास्त्रीय संगीत व वर्क्तृत्व स्पर्धा कलाबाबीमध्ये भंडारा जिल्ह्यातील कलाकारांनी सहभाग नोंदविला होता.
महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे प्रमुख अतिथी म्हणून प्रा.नीळकंठ रणदिवे, अहिरकर, धनंजय बिरणवार, नामदेव बोळणे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणातून शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांनी कला व संस्कृती समाजाला ज्ञान संपन्न करणाऱ्या मूलभूत मनोरंजनात्मक बाबी आहेत. तसेच युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांमध्ये सांस्कृतिक वारसांशी बांधिलकी व वैविधतेचे आकलन करण्यास मदत होईल असे मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सारंग हांडे, प्रा.नीळकंठ रणदिवे, स्नेहा हांडे, अस्मिता नानोटी, धनंजय बिरणवार, नामदेव बोळणे यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाल्या असून विभागीय युवा महोत्सवाकरिता निवड झालेल्या विजयी कलाकारांना सुभाष गांगरेड्डीवार, जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांनी शुभेच्छा दिल्या. सदर महोत्सवाचे संचालन ए.बी. मरसकोल्हे, क्रीडा अधिकारी यांनी केले. प्रास्ताविक मनोज पंधराम क्रीडा अधिकारी यांनी केले. आभार प्रदर्शन त्रिवेणी बांते क्रीडा अधिकारी यांनी केले.
सदर युवा महोत्सवाकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील भोजराज चौधरी, क्रीडा मार्गदर्शन, मिनल थोरात क्रीडा मार्गदर्शक, रविंद्र वाळके वरिष्ठ लिपीक, विलास बनकर, सूरज लेंडे, प्रदीप कांबळे, रामभाऊ धुडसे, नरेंद्र मते, तुषार नागदेवे, सौरभ भेदे, लिलाधर भेदे, राजू मडावी, वसंत पाल यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)