कलावंतांनी फुंकले आंदोलनाचे बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:21+5:302021-09-10T04:42:21+5:30
०९ लोक ०२ के साकोली : येथील भारत सभागृहात प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा व गोंदिया तथा ...
०९ लोक ०२ के
साकोली : येथील भारत सभागृहात प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा व गोंदिया तथा सर्वस्तरीय लोक कलावंत, साऊंड सिस्टीम डेकोरेशन, डी. जे. धुमाल, बँड पार्टी, कॅटरिंग फुलवारी, सभागृह संघटनेची सभा पार पडली. त्यात १३ सप्टेंबरला वेशभूषा संगीतमय आंदोलन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी भावेश कोटांगले, अध्यक्ष साऊंड सिस्टीम संघटना साकोलीचे अध्यक्ष प्रदीप नंदेश्वर, प्रबोधनकार मनोज कोटांगले, डी. जी. रंगारी, नाट्यकलावंत भूमाला कुंभरे, प्रियंका गायधनी, ममता कुरंजेकर, अर्चना कान्हेकर, विनोद मुरकुटे, रितेश बाळबुध्ये, अजित गायधने, योगेश राऊत, मनोज बोपचे, ईश्वर धकाते, मनोज पशीने आदी उपस्थित होते.
याप्रसंगी भूमाला कुंभरे यांनी कलावंतांवर होणार अन्यायासाठी आपण रस्त्यावर येऊन आंदोलन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मनोज कोटांगले यांनी गणेशोत्सवापासून सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होते. बरेच कलावंत व व्यावसायिक यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. पण गत दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बंद असण्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. परिणामी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं मत व्यक्त केले. प्रदीप नंदेश्वर यांनी सर्वस्तरीय आंदोलनात साउंड सिस्टिम डेकोरेशन केटरिंग सभागृह संघटना या आंदोलनात पूर्ण सहभाग देऊन आक्रमक भूमिका घेणार, असे मत व्यक्त केले.
प्रतिभावंत प्रबोधनकार कलासाहित्य संघटना अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी गेल्या दीड वर्षांपासून सतत लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन सुद्धा एवढच नव्हे तर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. दोन्ही जिल्ह्यांत संगीतमय आंदोलनसुद्धा करण्यात आले. प्रशासन कलावंतांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून साकोली येथे सर्वस्तरीय लोककलावंत, साउंड सिस्टिम डेकोरेशन, बँड डी जे धुमाल सभागृह संघटनेच्यावतीने सोमवारला वेशभूषा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल जर शासनाने घेतली नाही तर रस्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे. सभेत यशवंत बागडे, पितांबर सूर्यवंशी, सोनू मेश्राम, जासूद ठाकरे, संदीप नागदेवे, दिनेश टेंभरे, धनंजय धकाते, वृन्दावन मळामे, पिंटू पारधी, विदेश शहारे, गुड्डू बोरकर, मनोहर गणथाळे अरविंद शिवणकर खेमू, सोनू लाडे आणि सर्व साउंड सिस्टिम पदाधिकारी आणि कलावंत उपस्थित होते.