कलावंतांनी साकारला भ्याड हल्ल्याचा जिवंतपणा
By admin | Published: November 29, 2015 01:40 AM2015-11-29T01:40:59+5:302015-11-29T01:40:59+5:30
२६/११ च्या भ्याड हल्ल्यात वीर मरण आलेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता व देशभक्तीची भावना तेवत ठेवण्याकरिता
२६/११ च्या हल्ल्यावर नाटिका : वीर जवानांना श्रध्दांजली, नाटकातून दिले देशभक्तीचे धडे
पालांदूर : २६/११ च्या भ्याड हल्ल्यात वीर मरण आलेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता व देशभक्तीची भावना तेवत ठेवण्याकरिता खासदार नाना पटोले व मित्र परिवाराच्या वतीने पालांदूरात शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
रात्रीला विनामूल्य पुत्र भारत मातेचा या देशभक्तीपर नाट्यप्रयोगाचे सादरीकरण संगीत शिक्षक भास्कर पिंगळे यांच्या सहकार्यातून पार पडले. याकरिता भरत खंडाईत यांनी सहकार्य केले. दहशतवाद, आतंकवाद, नक्षलवाद या एकाच नाण्याच्या बाजू असून देशप्रेम पुढे ठेऊन प्रत्येक भारतीयाने सजगता बाळगणे महत्वाचे आहे. भारत मातेच्या रक्षणाकरिता शहीद झालेल्या वीर जवानांना नेहमी नगरजेसमोर ठेवून देशहिताला प्राधान्य द्या. क्षणीक आर्थिक लोभाला बळी न पडता देशप्रेम हीच आपली संपत्ती समजून तिरंग्याची शासन अबाधित ठेवा. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रेरणेतून जगाला देशभक्तीचा संदेश द्या. धर्म, पंथ, पक्ष देशाकरिता एक माणून विविधतेतून एकता शोधून भारत देशाला मोठे करा. असा आशावाद दिग्दर्शकांनी दिला. सुमारे ४० गावातील जनता नाट्यप्रयोगाला हजर होती. संगीत शिक्षक भाष्कर पिंपळे यांनी पालांदूर परिसरातील काही कलावंत व नामवंत नाट्यकलाकारांना आमंत्रित करून सिनेमासृष्टीच्या धर्तीवर केवळ पाच तासात लोकांना देशभक्तीचे धडे दिले. विशेष यातील सहभागी कलाकारांनी सहर्ष विनामुल्य कार्यक्रमाचे महत्व ओळखत व आयोजकांची निस्वार्थ सेवा बघत मेहनतनामा स्वीकारला नाही. पालांदूर, कवलेवाडा, मेंगापूर या तिन्ही गावांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम जिल्ह्यात नामांकीत ठरला. यात धनंजय पाटील मुंबई, प्राजक्ता गायकवाड पुणे, स्वप्नील कुळकर्णी पुणे, सुवर्णा नलोडे नागपूर, नेहल पिंपळे (बालकलाकार), ज्योती पिंपळे पालांदूर, प्रा.निंबेकर पालांदूर या सारख्या मोठ्या कलावंतांनी ग्रामीण भागात कला सादर करून ग्रामीण कलावंतांना आदर्श दिला. यावेळी कलाकारांनी पैशापेक्षा प्रेम मोठे आहे म्हणत रसिकांच्या हृदयात स्थान घट्ट केले. उद्घाटनाप्रसंगी कोणत्याही राजकारणी, अधिकारी न ठेवता रसिकातील पाहुणे व बालकलाकाररुपी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या हस्ते फित कापून नाटकाला विनाविलंब हिरवी झेंडी देण्यात आली. (वार्ताहर)