आसगाी-निघवी डांबरीकरणाचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:53+5:302021-01-08T05:53:53+5:30
०४ लोक १५ के चिचाळ : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पवनी तालुक्यातील आसगांव निघवी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत ...
०४ लोक १५ के
चिचाळ : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पवनी तालुक्यातील आसगांव निघवी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. नियमांना डावलून थातूरमातूर पद्धतीने रस्ता डांबरीकरणाचे काम होत असल्यामुळे या निकृष्ट दर्जाचा रस्ता किती काळ तग धरणार अशी तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
पवनी तालुक्यातील आसगाव निघवी या तीन कि.मी. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गोंदिया येथील एका कंत्राटदारामार्फत होत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने होत असलेल्या लाखो रुपयांच्या कामावर देखभालीकरिता प्रशासनाच्या वतीने एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थिती दर्शवीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अंदाजपत्रकानुसार काम करण्यात येत नाही. रस्त्याचे डांबरीकरण करीत असताना रस्ता झाडून डांबर टाकणे व त्यावर गिट्टीचा थर अंथरणे, असे अंदाजपत्रकात नमूद असताना कंत्राटदाराने साधा रस्ता झाडण्याचे सौजन्य दाखविले नाही. डांबर टाकून रस्ता काम सुरुवात केली. कामात कमी गुणवत्तेच्या डांबरीकरणाचा थर वापरण्यात येत आहे. कंत्राटदाराने केलेल्या कामाची चौकशी गुणवता नियंत्रण विभागामार्फत झाल्यानंतरच त्यांचे देयक अदा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या कामाची वेळीच चौकशी करण्याची मागणी ब्रम्ही येथील सामाजिक कार्यकर्ते विलास घावळे यांनी केली आहे.