आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:05 PM2018-12-28T22:05:28+5:302018-12-28T22:05:46+5:30
आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांच्या स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांसाठी २८ डिसेंबरला भंडारा जिल्हा परिषदेवर संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर आयटकचे अध्यक्ष माधवराव बांते व जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. रविंद्र जगताप मुकाअ जिल्हा परिषद भंडारा यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांच्या स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांसाठी २८ डिसेंबरला भंडारा जिल्हा परिषदेवर संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर आयटकचे अध्यक्ष माधवराव बांते व जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. रविंद्र जगताप मुकाअ जिल्हा परिषद भंडारा यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आशा कर्मचाºयांना सर्वाेच्च न्यायालय व केंद्रीय कामगार संघटनांच्या मागणीनुसार दरमहा १८ हजार किमान वेतन द्या, आशांना शासकीय सेवेत शामिल करा, संपकाळात केलेल्या कामाचा मोबदला द्या, प्रमोटर्सच्या कामाचा मोबदला, मानवनिदेशांक विकास कामाबद्दलचा मोबदला, रुग्णालयात व्यवस्था स्टेशनरी द्या किंवा त्याचा बिल आदी मागण्यांचा समावेश होता.
सीईओ रविंद्र जगताप यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संबंधित मागण्या त्वरीत सोडवण्याचे व शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश व आश्वासन दिले. जिल्हा परिषद समोर झालेल्या सभेत शिवकुमार गणवीर, हिवराज उके व माधवराव बांते यांनी मार्गदर्शन केले तर शिष्टमंडळात वरील पुढाऱ्यांसोबत सुनंदा दहिवले, आशिषा मेश्राम, लोभा सोनवाने, भूमिका वंजारी, मीना कुथे यांचा समावेश होता. मोर्च्यात मोठ्या संख्येत आशा कर्मचारी सहभागी होत्या.
पोषण आहार कर्मचाऱ्यांचा आज आक्रोश मोर्चा
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर बसस्थानक भंडारा येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. भंडारा जिल्ह्यातील सर्व आशा कर्मचाºयांनी वेळेवर मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक जिल्हा भंडारा तर्फे करण्यात येत आहे.