महेंद्र सोनेवाने यांना एशियन एज्युकेशन अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:35 AM2021-05-23T04:35:31+5:302021-05-23T04:35:31+5:30

या पुरस्काराचा सोहळा एशिया स्तरावर ऑनलाईन महासंमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे. या पुरस्कारासाठी १५ वर्षाचा अनुभव विचारण्यात ...

Asian Education Award to Mahendra Sonewane | महेंद्र सोनेवाने यांना एशियन एज्युकेशन अवॉर्ड

महेंद्र सोनेवाने यांना एशियन एज्युकेशन अवॉर्ड

Next

या पुरस्काराचा सोहळा एशिया स्तरावर ऑनलाईन महासंमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे. या पुरस्कारासाठी १५ वर्षाचा अनुभव विचारण्यात आला होता. त्यात शैक्षणिक क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य जे विद्यार्थ्यांपासून तर समाजापर्यंत केलेले असून शिक्षक उपक्रमशील असावे. नवीन अभ्यासक्रम ऑनलाईन हाताळता आले पाहिजे . एशियाच्या काही नामवंत एज्युकेशन ऑर्गनायझेशन मिळून हे पुरस्कार देत असतात. शिक्षकांना त्यांच्या कामाबद्दल प्रोत्साहन मिळाले पाहिजे जेणेकरुन त्यांचा आपल्या कामाबद्दल प्रेम निर्माण होऊन आपले काम प्रामाणिकपणे व उत्साहाने करीत राहतील. शिक्षक हे राष्ट्रनिर्माता असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे हे या ऑर्गनायझेशनचे उद्दिष्ट आहे . महेंद्र सोनेवाने हे आपल्या कामात सकारात्मक भूमिका ठेवून कार्य करीत असतात. वर्षभर वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम करीत असतात. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत असतात . कोविडच्या काळातही ऑनलाईन शिक्षणाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करीत आहेत . त्यांना “ एशियन एज्युकेशन अवाॅर्ड , २०२१ ” ने सन्मानित करण्यात आले . प्राचार्य के. एल. पुसाम, एम. एल. मेश्राम, गोकुल परदेशी, ओ.एस.गुप्ता, यशोधरा सोनेवाने, रतिराम भांडारकर, जयंत मुरकुटे, दिपेश सोनेवाने , डॉ. मंगेश सोनेवाने यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Asian Education Award to Mahendra Sonewane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.