अड्याळ येथील समस्यांसाठी जिल्हा प्रशासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:40 AM2021-08-20T04:40:42+5:302021-08-20T04:40:42+5:30

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामपंचायतीच्या हद्दीत ले आउट पाडले पण तेथील ओपन स्पेस अद्याप ग्रामपंचायतीच्या नावे नाही. याबाबतची नोंद सुद्धा ...

Ask the district administration for the problems at Adyal | अड्याळ येथील समस्यांसाठी जिल्हा प्रशासनाला साकडे

अड्याळ येथील समस्यांसाठी जिल्हा प्रशासनाला साकडे

Next

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामपंचायतीच्या हद्दीत ले आउट पाडले पण तेथील ओपन स्पेस अद्याप ग्रामपंचायतीच्या नावे नाही. याबाबतची नोंद सुद्धा तहसील कार्यालयात सुद्धा नाही, सहा वर्षे आधी पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम झाले, ते अद्याप ग्रामपंचायतीला हॅड ओव्हर झाले नाही, गेली दोन वर्षांपूर्वी खोदकाम करून नवीन जलवाहिनी ६७ लाखांची तेही पूर्ण झाली नाही. पुनर्वसन क्षेत्रामधील ग्रामस्थांची समस्या तथा अड्याळ येथे वाढलेले अतिक्रमण अशा विविध समस्येवर जिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात चर्चा झाली.

यावर लवकरात लवकर तोडगा निघण्यासाठी माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अड्याळ ग्रामवासी,तंटामुक्त समिती अध्यक्ष,स्वरक्षण टीम व फ्रेंड्स सर्पमित्र ग्रुपचे सदस्यांनी गावात असलेल्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गावातील सरपंच सुद्धा उशिरा का होईना पण तेही यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत तिथे एक ग्रामविकास अधिकारी नियमित नाहीत, तसेच नायब तहसीलदार कार्यालयात सुद्धा ठरलेल्या वेळेवर तथा दिवसाला येत नाहीत. उर्दू शाळा अनेक वर्षांपासून मोडकळीस आली आहे, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेने जर दुकान गाळे बांधले आणि वरच्या माळ्यावर जर वाचनालयाची भव्य वास्तू तयार केली तर गावातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांनाही त्याचा लाभ होईल. महामार्गाच्या बाजूला कन्या जिल्हा परिषद शाळेची भव्य इमारत तेही मोडकळीस येत आहे याकडेही लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने यावेळी विलास शृंगारपवार यांनी केली.

वॉटर फिल्टर अनेक वर्षांपासून आहे, त्याची क्षमता कमी झाली तसेच गावात दूषित पाण्याचा सतत पुरवठा होतो आहे. यामुळे याकडेही लक्ष केंद्रित करून त्याठिकाणी सोलर प्लांट जर उभारला तर ग्रामपंचायतीला येत असणारा विद्युत बिल हा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल, असेही यावेळी ते बोलले.

Web Title: Ask the district administration for the problems at Adyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.