अस्मितादर्श चळवळीने आंबेडकरी विचार रुजविले
By admin | Published: July 2, 2015 12:46 AM2015-07-02T00:46:14+5:302015-07-02T00:46:14+5:30
अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ.गंगाधर पानतावणे यांनी आंबेडकरी चळवळीला वैचारिक अधिष्ठान देऊन मराठी साहित्य ..
गं्रथसंवाद कार्यक्रम : हर्षल मेश्राम यांचे प्रतिपादन
भंडारा : अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ.गंगाधर पानतावणे यांनी आंबेडकरी चळवळीला वैचारिक अधिष्ठान देऊन मराठी साहित्य संस्कृतीचा प्रवाह अधिक विस्तृत व सखोल केला. त्यांचा विद्याव्यासंग आणि विचार साधना परिवर्तनशील चळवळीला नेहमीच प्रेरणादायी राहिली, असे प्रतिपादन साहित्यिक हर्षल मेश्राम यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय व विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने ग्रंथसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड.सुधीर गुप्ते होते. यावेळी मेश्राम म्हणाले, त्यांनी अनेक अपरिचित व अप्रकाशित लेखक, साहित्यीक व कवींना लिहिण्याचे बळ दिले. जागतिक स्तरावर त्यांच्या वैचारिक लेखनाची चर्चा केली जाते. डॉ.पानतावणे यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी घटनांचा संदर्भ दिला.
यावेळी ‘पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ग्रंथसंवाद घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते डॉ.अनिल नितनवरे होते. ग्रंथाविषयी बोलताना डॉ.नितनवरे म्हणाले, हा ग्रंथ म्हणजे अनेक गं्रथाचा मुळाधार व ग्रंथाचा बाप आहे. हा शोधग्रंथ म्हणजे वृत्तपत्रीय विश्वातील सतत प्रेरणा देणारे स्त्रोत आहे. यातूनच डॉ.यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, डॉ.कुंभारे, डॉ.खरात, डॉ.कांबळे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा आपल्या ग्रंथातून शोध घेतला. परंतु या सर्वांचे मुळबीज डॉ.गंगाधर पानतावणे यांनी लिहिलेल्या पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या शोध ग्रंथात सापडतात. त्यांच्या लिखाणात आक्राळस्तेपणा नाही. सयंत व सापेक्षी समीक्षक आहेत.
अॅड. गुप्ते म्हणाले, डॉ.पानतावणे निर्मेही व निरागस माया करणारे वात्सल्यवृक्ष आहेत. मागील चार वर्षापासून त्यांच्याच ग्रंथावर गं्रंथसंवाद हा कार्यक्रम घेत असतो. यावेळी डॉ.जयंत आठवले, डॉ.लोकनाथ गिऱ्हेपुंजे, जी.बी. चरडे, विनोद मेश्राम, विनोद आकरे, नीळकंठ साखरवाडे, निळकंठ रणदिवे, मा.ह. रामटेके, विनय श्रृंगारपवार, गुणवंत काळबांडे, पत्रकार जयकृष्ण बावणकुळे उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रदीप गादेवार यांनी केले. कार्यक्रमाकरिता घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, सुधीर खोब्रागडे, दिनेश हरडे, युवराज साठवणे व सुभाष साकुरे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)