पारडी‌-मुरमाडी मानेगाव रस्त्याचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:20+5:302020-12-30T04:44:20+5:30

भंडारा : : लाखांदूर तालुक्यातील पारडी ते मुरमाडी मानेगाव रस्त्यावरील डांबर उखडून गी टी बाहेर पडली असून रस्त्यावर खड्डे ...

Asphalt Pardi-Murmadi Manegaon road | पारडी‌-मुरमाडी मानेगाव रस्त्याचे डांबरीकरण करा

पारडी‌-मुरमाडी मानेगाव रस्त्याचे डांबरीकरण करा

Next

भंडारा : : लाखांदूर तालुक्यातील पारडी ते मुरमाडी मानेगाव रस्त्यावरील डांबर उखडून गी टी बाहेर पडली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यावरून प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना कमालीचा शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत असून तालुका प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या यंत्रणेने याबाबत वेळीच दखल घेऊन सदर रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी भीमशक्ती संघटने ने एका लेखी निवेदनातून केली आहे .

पार डी , मुरमाडी ,माणेगाव या परिसरातील शेतकरी नागरिकांना तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथे दररोज आवागमन करावे लागते तसेच विद्यार्थ्यांना महाविद्या लयीन शिक्षणासाठी याच मार्गावरून ये जा करावी लागते ऐवढेच नव्हे तर रुग्णांना औषधोचारासाठी लाखांदूर येथी ल ग्रामीण रुग्णालयात जावे लागते परंतु सदर रस्त्यावरील डांबर उखडून मोठ मोठे खड्डे पडले असून पादचारी ,वाटसरू, सायकल स्वार दुचाकी तसेच चारचाकी वाहन धारक प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याची दस्तुरखुद्द नागरिकांची मोठी ओरड असून सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्या ने अपघात झाल्यास जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसून यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे .याबाबत पा र डी परिसरातील शेतकरी तसेच प्रवाशी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्ता नादुरुस्त असला तरी या रस्त्याचे डांबरीकरण न करण्याचे कारण काय.नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात होऊन जीवित व वित्त हानी झाल्यास त्यास जबाबदार कोण करणार,सदर रस्त्याचे डांबरीकरण करणार किंवा कसे आदी प्रश्न प्रकाश देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.

याबाबत लाखांदूर तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन पा रडी- मुरमाडी ते मानेगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे एस के वैद्य बाळकृष्ण शेंडे हरिदास बोरकर भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, संदीप बर्वे, मनोहर दहीवले, शांताराम खोब्रागडे, मच्छिंद्र टेंभुर ने, धनराज तिरपुडे, नरेन्द्र कांबळे, फाल्गुन वंजारी,अरुण ठवरे, रतन मेश्राम,दौलत बोरकर यांनी एका लेखी निवेदनातून केली असून दुर्लक्ष केल्यास जन आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Web Title: Asphalt Pardi-Murmadi Manegaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.