वाकल-हरदोली रस्त्याचे डांबरीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:26+5:302020-12-31T04:33:26+5:30
वाकल व हरदोली शेतकरी, शेतमजूर बांधवांना या मार्गावरून शेत शिवारात आवागमन करावे लागते तसेच विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात विद्यार्जन करण्यासाठी ...
वाकल व हरदोली शेतकरी, शेतमजूर बांधवांना या मार्गावरून शेत शिवारात आवागमन करावे लागते तसेच विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात विद्यार्जन करण्यासाठी दररोज ये जा करावी लागते आणि रुग्णांना औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागले परंतु सदर रस्त्यावरील डांबर उखडून गी टी बाहेर पडली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने पादचारी,सायकल स्वार दुचाकी तसेच चारचाकी वाहन धारक प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना कमालीचा शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची दस्तुरखुद्द नागरिकांची ओरड आहे. सदर रस्ता आजतागायत नादुरुस्त असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाक ल ते हर दो ली रस्ता रहदारीस त्रासदायक ठरत असल्यामुळे प्रवाशी नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी पसरली असून भविष्यात असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्ता दुरुस्त करण्यासाठी अतिविलंब होत असल्याने संबंधित विभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह उभे ठाकले आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन वाक ल ते हर दो ली रस्त्याचे डांबरीकरण करण्याची तसदी घ्यावी व तमाम नागरिकांना दिलासा देणारा लोककल्याणकारी निर्णय घ्यावा अशी मागणी भीम शक्ती संघटने चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे एस के वैद्य बाळकृष्ण शेंडे हरिदास बोरकर भागवत दामले वामन कांबळे माधव बोरकर हर्ष वर्धन हूम ने तोताराम दही व ले,दामोधर उके,महादेव देशपांडे,बंडू फुलझेले अंबादास नाग दिवे नंदू वाघमारे अरुण ठ व रे, जयपाल रामटेके फाल्गुन वंजारी रूपा मेश्राम,विजय भोव ते, रक्षा नंद नंदा गवळी,यांनी केली असून या कडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.