गोंदेखारी येथे पट्टेदार वाघाचा इसमावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:27+5:30
गणेश बनकर (५२) रा.गोंदेखारी असे जखमी इसमाचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी गावातील नाल्यातून शनिवारी सकाळी ८ वाजता वाघाची डरकाळी गावकऱ्यांना ऐकू आली. गावालगत वाघ असल्याची जाणीव झाली. त्यामुळे गावातील अनेकांनी नाल्याच्या दिशेने धाव घेतली. वाघाचा शोध सुरु झाला. परंतु वाघ झुडूपात लपून असल्याने तो सुरुवातीला दिसला नाही. मात्र वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. एका झुडूपात शोध घेत असताना गणेश बनकर या इसमावर वाघाने अचानक हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : गावालगतच्या नाल्यात लपून बसलेल्या वाघाला हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या गावकºयातील एका इसमावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना तुमसर तालुक्यातील गोंदेखारी शिवारात शनिवारी सकाळी ८ वाजता घडली. वाघाच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गावकऱ्यांनी तुर्तास या वाघाला पिटाळून लावले असले तरी या वाघाची दहशत मात्र दिसत आहे.
गणेश बनकर (५२) रा.गोंदेखारी असे जखमी इसमाचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी गावातील नाल्यातून शनिवारी सकाळी ८ वाजता वाघाची डरकाळी गावकऱ्यांना ऐकू आली. गावालगत वाघ असल्याची जाणीव झाली. त्यामुळे गावातील अनेकांनी नाल्याच्या दिशेने धाव घेतली. वाघाचा शोध सुरु झाला. परंतु वाघ झुडूपात लपून असल्याने तो सुरुवातीला दिसला नाही. मात्र वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. एका झुडूपात शोध घेत असताना गणेश बनकर या इसमावर वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार पाहताच उपस्थित गावकºयांनी आरडाओरडा केला. त्यामुळे वाघ लगतच्या शेतात पळून गेला. जखमी गणेश बनकरला सिहोराच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर अधिक उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गाव शिवारात वाघ शिरल्याची माहिती बपेरा वनविभागाला देण्यात आली. तसेच घटनास्थळावर सिहोरा पोलिसांनीही धाव घेतली. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागामार्फत पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. गावाजवळ वाघ आल्याचे माहित होताच शेकडो नागरिकांनी घटनास्थही धाव घेतली.
गावाच्या शेजारी वाघाचे दशर््न झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान तुर्तास गावकऱ्यांनी या वाघाला पिटाळून लावले आहे. सदर वाघ बपेरा शिवाराच्या दिशेने गेला. या शिवारात महालगाव, बिनाखी, सुकळी, गोंडीटोला, देवसर्रा ही गावे आहेत. या गावातील नागरिकांना सूचना देण्यात आली आहे. गावात भीतीचे वातावरण आहे.
जंगलात नागरिकांचा शिरकाव
सातपुडा पर्वतरांगातील ग्रीन व्हॅली चांदपूरच्या घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. परंतु अलिकडे जंगलात पार्टीच्या नावाखाली नागरिकांचा शिरकाव सुरु झाला. त्यामुळे वन्यप्राणी सैरवैर होत असून गावाकडे धाव घेत आहे. अशाच प्रकारात पट्टेदार वाघ या परिसरात आला असावा असा कयास आहे. चांदपूर जंगलात पर्यटन स्थळावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. यासंधीचा फायदा घेत अनेकदा ओल्या पार्ट्याही जंगलात होतात. वन्य जीवांच्या नैसर्गीक अधिवासाला यामुळे धोका निर्माण होतो. वन्यप्राणी धोक्यात आले आहे. गत काही वर्षात नागरिकांची जंगल भ्रमणाची गर्दी वाढली आहे. परंतु वनविभागाच्या नियमाकडे दुर्लक्ष होत आहे. वनविभागही याकडे लक्ष देत नाही.