धुळ्यातील निर्धारकांनी हिंगणा शाळेचे केले मूल्यांकन

By Admin | Published: April 4, 2016 12:59 AM2016-04-04T00:59:19+5:302016-04-04T00:59:19+5:30

महाविद्यालयाप्रमाणेच प्राथमिक शाळांचा मूल्यमापनाची पध्दत राज्यात सुरु करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील

Assessment done by Hingana school by the determinants of Dhule | धुळ्यातील निर्धारकांनी हिंगणा शाळेचे केले मूल्यांकन

धुळ्यातील निर्धारकांनी हिंगणा शाळेचे केले मूल्यांकन

googlenewsNext

ंतुमसर : महाविद्यालयाप्रमाणेच प्राथमिक शाळांचा मूल्यमापनाची पध्दत राज्यात सुरु करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हिंगणा व लाखनी तालुक्यातील खराशी शाळांचा समावेश आहे. राज्य स्तरावर निवड झालेल्या या शाळांचे मूल्यमापन तज्ज्ञ निर्धारकांच्या पथकाने नुकतेच केले. हिंगणा येथे धूळे येथून निर्धारक आले होते. शाळेतील भौतिक सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
समृध्द शाळा कार्यक्रम राज्य शासनाने सुरु केला आहे. याकरिता १४४ तज्ज्ञ शिक्षकांनी निर्धारक म्हणून नेमणुक केली आहे. त्यांच्याकडून शळांची तपासणी दोन टप्प्यात करवून घेतली.
तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिंगणा, या शाळेची बाह्यमूल्यांकनाकरिता धुळे येथून निर्धारक मनोहर चौधरी व विजय मंगलानी आले होते.
तज्ज्ञ निर्धारकांनी शाळेतील भौतीक सोयी सुविधांची पाहणी केली. येथील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. शाळेचा परिसर, संगणक कक्ष, शालेय दस्ताऐवज, शाळा परिसरातील हिरवळ व लोकसहभागाची तज्ञ निर्धारकांनी समाधान व्यक्त केले. शाळेत लोकसहभागाशिवय अपडेट होवू शकत नाही असे सांगुन याच मुद्यासह ७८ बिंदूवर राज्य शासनाचा फोकस असल्याचे तज्ज्ञ निर्धारक मनोहर चौधरी व विजय मंगलानी यांनी सांगितले. शाळेत आयोजित कार्यक्रमाना तुमसर पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय आदमने, शाळा शिक्षण समिती अध्यक्ष शिशुपाल टेंभरे, उपाध्यक्ष संजय बावणे, सरपंच लता बावणे, उपसरपंच अमर टेंभरे, तंटामुक्ती अध्यक्ष जगदीश पटले, पोलीस पाटील सुखदेव राहांगडाले, शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. पारधी, माजी सरपंच संजय टेंभरे, शरणागते, सुधिर वासनिक, नामदेव राहांगडाले, छाया नागमोते, बाबुराव शरणागत, दमयंता राहांगडाले, विजया टेंभरे, कपूर शेंदे, ग्रामसेवक आर. एस. कारेमोरे, शाळेतील शिक्षक बिसेन, पटले, मलेवार, रहांगडाले सह विद्यार्थी, पालक तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील ७२ शाळांत निवड
राज्यातील ७२ शाळांचे बाह्यमुल्यांकन राज्य शासनाने आपल्याच तज्ञ शिक्षकांकडून केले. येत्या काळात देशाच्या शिक्षण क्षेत्रात राज्याचे टॉप थ्रीमध्ये भरारी मारावी असे स्वप्न पाहिले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Assessment done by Hingana school by the determinants of Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.