हागणदारीमुक्तीसाठी रासेयो सेवकांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:02 PM2018-02-04T22:02:28+5:302018-02-04T22:02:54+5:30

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने ग्रामस्तरावर सामाजिक बांधिलकीचे विविध कार्य पार पाडल्या जातात.

Assistance to Rescue Loans | हागणदारीमुक्तीसाठी रासेयो सेवकांची मदत

हागणदारीमुक्तीसाठी रासेयो सेवकांची मदत

googlenewsNext
ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : अकरा महाविद्यालयांवर सोपविणार जबाबदारी

आॅनलाईन लोकमत
भंडारा : राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने ग्रामस्तरावर सामाजिक बांधिलकीचे विविध कार्य पार पाडल्या जातात. त्यांचे कार्य व्याख्यानाजोगे असून आता रासेयो विदयार्थ्यांनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात सहभाग घेवून सामाजिक दायत्विाने स्वच्छतेच्या कायार्ने गावांना नंदनवन करण्यासाठी हागणदारीच्या जागा स्वच्छ व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात पार पडलेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शहा, अजय गजापूरे, दिपक बोडखे, व जिल्ह्यातील अकरा महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक यांची उपस्थिती होती.
जिल्ह्याची हागणदारीमुक्त प्लसच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून स्वच्छतेच्या कार्याला चालना देण्यासाठी अनेक ग्राम पंचायतीमध्ये गावातील हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. स्वच्छतेबरोबरच आता प्लॉस्टीक बंदीची मोहिम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात ही मोहीम अधिक गतीशिल व्हावी, याकरिता आता रासेयो विभागांचा सहभाग घ्यायचा आहे. त्या उद्देश्याने भंडारा येथील जे.एम.पटेल महाविद्याल व आठवले महाविद्यालय यांचेसह जिल्ह्यातील अकरा महाविद्यालयाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात बोलविण्यात आली होती.
प्रत्येक महाविदयालयांनी या करिता ३ गावे दत्तक घ्यावीत. त्या गावांमध्ये हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यासाठी दिवसभर श्रमदान, स्वच्छता रॅली, पथनाटयांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून जनजागृती करावी व भंडारा जिल्हयाला राज्यात दिशादर्शक ठरण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शाळा व अंगणवाडी स्तरावर स्वच्छतेचे महत्व सांगून धडे देणे, प्लॉस्टीक बंदीसाठी वातावरण तयार करणे याकरिता कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यावर भर देणे, पावसाळयात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणे यासह गावांना स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विविध उपक्रम या माध्यमातून राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी यांनी आवाहन केले.
नागरिकांचे जिवनमान उंचावण्यासाठी, पर्यावरणाचे संवर्धनासाठी, निरोगी आरोग्यासाठी व विविध पैलूंनी महत्वाचा व नाविण्यपूर्ण, नागरिकांच्या हिताचे कार्य भंडारा जिल्हयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक गतिशील करण्यासाठी रासेयो विभागाचे जिल्हयातील अकरा महाविदयालयाचे कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग देण्याचे अभिवचन दिले. यावेळी कार्यक्रम अधिकारी राजेंद्र शहा, आठवले समाजकार्य महाविदयालयाचे डॉ. नरेश कोलते, निर्धनराव पाटील महाविदयालयाचे लाखनी यू.पी. शहारे, संताजी महाविदयालय पालांदूर संजयकुमार निंबेकर, श्यामरावबापू कापगते महावियालय साकोली प्रा. गणेश पाथोडे, कला वाणिज्य महाविदयालय पेट्रोल पंप जवाहरनगर विजय गणवीर, साई कला वाणिज्य महाविदयालय तूमसर संदीप चामट, समर्थ महाविदयालय लाखनीचे श्री धनंजय गि-हेपूंजे, निर्धनराव पाटील वाघाये महाविदयालय एकोडीचे डॉ. सोपान बोंडे, कला वाणिज्य महाविदयालय करडीचे निलकंठ सोनेकर यांची उपस्थिती होती.

Web Title: Assistance to Rescue Loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.