सहायक आयुक्तांनी केली वसतिगृहाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:10 AM2017-11-15T00:10:45+5:302017-11-15T00:10:58+5:30

तुमसर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. येथील मुलांना सुविधा पुरविण्यात येत नसल्याची तक्रार होती.

The assistant commissioner did the survey of the hostel | सहायक आयुक्तांनी केली वसतिगृहाची पाहणी

सहायक आयुक्तांनी केली वसतिगृहाची पाहणी

Next
ठळक मुद्देमुलांच्या तक्रारींची दखल : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. येथील मुलांना सुविधा पुरविण्यात येत नसल्याची तक्रार होती. याची दखल घेत सहायक आयुक्त आशा कावळे यांनी मंगळवारला वसतीगृहाला भेट दिली.
विनोबा नगर येथील मागासवर्गीय मुलांचे हे शासकीय वसतिगृह गत वर्षात शिवाजी नगरातील, नगराध्यक्ष पडोळे यांच्या खासगी मालकीच्या रिकाम्या अंजना भवनात स्थानांतरीत करण्यात आले होते. या वसतिगृहाची पाहणी सहायक आयुक्त यांनी मार्फत मंगळवारला करण्यात आली. सन २०१४ पासून ते स्थानांतरीत करण्यात आलेल्या एक ते दिड वर्षाच्या कालावधीत शासकीय वसतिगृहात राहणाºया मुलांना मुलभुत सोय सुविधांपासून वंचित राहावे लागले. मुलांना योग्य आहार व नित्य लागणाºया बाबींची पूर्तता करण्यात गृहपाल एस.एम. आबोजवार हे टाळाटाळ करतात, असे मुलांनी सहाय्यक आयुक्तांना परस्पर सांगितले. २०१४ पासून जेवनाची सोय पाहिजे त्या पध्दतीने न करता व आरोग्यास उपयोगी बाबींची पुर्तता न करता गृहपाल मुलांना धमकावून परिस्थितीवर चुप राहण्यास लावत असल्याचे आरोप मुलांनी केले आहे. गृहपाल हिटलरशाहीने मुलांना वागवून मानसीक त्रास देत असल्याने मुलांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्त येणार असल्याचे लक्षात घेवून वसतीगृहाच्या स्वच्छतेला कर्मचारी लागले असल्याचे मुलांनी सांगितले हे विशेष.
शासनाच्या आदेशाची व नियमावलींची येथे पायमल्ली करुन गृहपाल हे वसतीगृहात न राहता शहरात दुसºया ठिकाणी भाड्याची खोली करुन राहतात. वसतीगृहात कधीकाळी मुलांच्या आरोग्यास किंवा अपराधी वृत्त्तीने शहराची संवेदनशिलता लक्षात घेवून काही अनैतीक घडल्यास, जबाबदार कोण राहणार असा प्रश्न मुलांनी आयुक्तांकडे उपस्थित केला. थंडीच्या दिवसात आंघोळीकरिता गरम पाणी नसल्यामुळे दर आठ ते दहा दिवसांनी मुले आंघोळ करतात. पाणी गरम करण्याचे सोलार सिस्टम गेल्या तीन वर्षापासून निकामी असल्याचे मुलांनी सांगितले. वसतीगृहाच्या इमारतीमध्ये गृहपाल हे परिवारासह राहू शकतील अशी पर्यायी सुविधा नल्यामुळे गृहपालांनी वसतीगृहात जास्त काळ वेळ देण्याची सक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक आयुक्त आशा कावळे यांनी मुलांच्या समक्ष कर्मचाºयांना तसेच गृहपालांना उद्भवलेल्या समस्येबाबत विचारणा केली तर उळवा उळवीची उत्तरे देवून प्रकरणाला दुसरी दिशा देण्याच्या प्रयत्नात कर्मचारी दिसून आले. वसतीगृहाकरीता धान्य साठा तसेच आहाराची पुरवठा करणारे पुरवठदार हे नागपूरहून एकदाही परस्पर न येता साहीत्य पुरवीत असल्याची तक्रारही मुलांमार्फत करण्यात आली. वरिष्ठांनी पुरवठदार तसेच वसतीगृहात होत असलेल्या साहीत्य खरेदीची योग्य चौकशी केली तर मोठा घोळ उघडकीस येण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. आयुक्तांकडून दखल घेवून गृहपालांच्या विरुद्ध मुलांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीचा खुलासा देण्याची सक्ती करण्यात आली आहे.शाकाहारी तथा मासांहारी तसेच दररोजच्या जेवणाची मांडणी करण्याकरीता मुलांसोबतच चर्चा केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. रोजच्या जेवनाची सहानिशा करण्याकरिता आयुक्तांनी मुलांच्या डब्यातील अन्न खाऊ न खात्री केली. शासकीय नियमांचा आधार घेवून नित्य जेवनाचे पदार्थ, खेळासाठी येत असलेला निधी, मुलांना मिळणारा नसल्याची तक्रार आहे.

मुलांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येच्या चौकशीचे आदेश काढून संबंधीत गृहपालावर कारवाई केली जाईल. मुलांच्या सोयसुविधांची तत्काळ पुर्तता केली जाणार व दर पंधरा दिवसांनी वसतीगृहाची पाहणी नेमलेल्या निरीक्षकांकडून केली जाईल.
-आशा कावळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,भंडारा.

Web Title: The assistant commissioner did the survey of the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.