सहायक आयुक्त करतात पशु चिकित्सकांचे काम

By admin | Published: April 1, 2016 01:08 AM2016-04-01T01:08:25+5:302016-04-01T01:08:25+5:30

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मोहाडी तालुक्यात असलेले पशु वैद्यकिय दवाखान्यात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे.

Assistant commissioner Vet work | सहायक आयुक्त करतात पशु चिकित्सकांचे काम

सहायक आयुक्त करतात पशु चिकित्सकांचे काम

Next

पशुधन धोक्यात : पशु चिकित्सकांच्या जागा रिक्त
सिराज शेख मोहाडी
पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मोहाडी तालुक्यात असलेले पशु वैद्यकिय दवाखान्यात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे. नाईलाजास्तव येथील पशुवैद्यकिय सहायक आयुक्तांना पशु चिकित्सकांचे काम करावे लागत आहे.
सहायक आयुक्त तालुका लघु पशुवैद्यकिय सर्व चिकित्सालय मोहाडी अंतर्गत, मोहाडी, जांब, मुंढरी व कोका असे चार पशु सर्व चिकित्सालये अंतर्भुत आहेत. मात्र या चारही ठिकाणी पशु चिकित्सकाच्या जागा अनेक दिवसापासुन रिक्त आहेत. या विभागात शेतीला पुरक व्यवसाय म्हणून गाय, म्हशी, बकऱ्यांचा जोउ धंदा येथील शेतकरी करतात. या जनावरांना अनेकदा अनेक प्रकारच्या साथींच्या रोगांना सामोरे जावे लागते. अश्या परिस्थितीत पशु दवाखान्यात जर डॉक्टर उपलब्ध नसेल तर अनेकदा या जनावरांचा मृत्यू होतो व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. दुभत्या गायीची किंमत १० हजारापासुन ४० हजारापर्यंत तर म्हशीची किंमत २० हजारापासुन ७० हजारापर्यंत असते.
जनावरांच्या दुधापासुन मिळणाऱ्या उत्पन्नापासून शेतकऱ्यांचा आर्थिक प्रपंच चालत असतो आणि हेच जनावरे जर उपचाराअभावी दगावली तर शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक फटका बसतो. मोहाडी येथे पशुधन विकास अधिकारीची जागा आगष्ट २०१५ पासून, पशुधन पर्यवेक्षकाची जागा एप्रिल २०१५ तर वरिष्ठ लिपीकाची जागा सन २००८ पासुन रिक्त आहेत. पशुवैद्यकिय सर्व चिकित्सालय जांब येथे पशुधन पर्यवेक्षकांची जागा रिक्त असून या दवाखान्याचा डोलारा एकट्या परिचराच्या खांद्यावर आहे. कोका येथेही हीच परिस्थिती आहे. मुंढरी येथील पशुदवाखान्याची मोठी गंभीर स्थिती आहे. सहायक पशुधन विकासअधिकाऱ्यांची जागा सन २००६ पासुन रिक्त होती. परिचरच डॉक्टरचे काम करीत होते. तेही आॅक्टोंबर २०१५ ला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मुंढरी येथील पशुदवाखाना ओसाड पडला आहे. या दवाखान्यात एकही कर्मचारी नाही.

Web Title: Assistant commissioner Vet work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.