अट्टल घरफोड्या गजाआड

By Admin | Published: January 31, 2015 11:14 PM2015-01-31T23:14:19+5:302015-01-31T23:14:19+5:30

मागील आठवड्यात तुमसर शहरात सहा घरफोड्या झाल्या. तुमसर पोलिसांनी रात्रीचे गस्त पथक तैनात केले. गस्ती पथकाला रात्री बिरजू उर्फ रामकिशन तुकाराम कुंभरे (५०) रा. मुरमार

Atal Burglary GoAge | अट्टल घरफोड्या गजाआड

अट्टल घरफोड्या गजाआड

googlenewsNext

तुमसर : मागील आठवड्यात तुमसर शहरात सहा घरफोड्या झाल्या. तुमसर पोलिसांनी रात्रीचे गस्त पथक तैनात केले. गस्ती पथकाला रात्री बिरजू उर्फ रामकिशन तुकाराम कुंभरे (५०) रा. मुरमार जि. गोंदिया हा संशयास्पद फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मध्यप्रदेशासह गोंदिया व भंडारा जिल्ह्यात घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे.
तुमसरातील घरफोड्या सत्रावर अंकुश लावण्याकरिता भंडारा एलसीबी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांची मदत घेण्यात आली होती, हे विशेष.
अज्ञात चोरांचाही शहरातील विनोबा भावे नगरातील गौरीशंकर मालाधरे यांच्या बंद दाराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला होता. कुटूंबातील इतर सदस्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटा पळून गेला. पोलिसांनी गस्त वाढविली होती. चोरट्यांनी श्रीरामनगरातील रामदयाल फुंडे यांचा पानठेला तोडून शिगरेट तथा १ हजार ८१० रूपयांचा माल लंपास केला. दरम्यान रात्री खुद्द पोलीस निरीक्षक किशोर गवई गस्तीवर होते.
देव्हाडी खापा चौकात आरोपी बिरजू कुंभरे संशयास्पद स्थितीत आढळला. बिरजूची चौकशी करता त्याने उलटसुलट उत्तरे दिली. तपासणी दरम्यान सिगरेट व अन्य मुद्देमाल सापडला. आरोपी बिरजूने यापूर्वी सालेकसा, देवरी, गोंदिया, तिरोडा, मध्यप्रदेशासह तुमसर तालुक्यात चोरी केली आहे.
एका आठवड्यापुर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्या घरमालकासह इतर आठ घरी शहरात घरफोड्या झाल्या होत्या. यात बिरजूचा काही संबंध होता काय याचा तपास तुमसर पोलीस करीत आहे. कारवाईत तुमसर डीबी पालकातील धमेंद्र बोरकर, गिरीश पडोळे, जयसिंग लिल्हारे, कैलास पटोले यांचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Atal Burglary GoAge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.