अटल महापणन विकास अभियान कार्यशाळा
By admin | Published: February 10, 2017 12:33 AM2017-02-10T00:33:26+5:302017-02-10T00:33:26+5:30
राज्यातील सहकारी पणन महासंघ, तालुका खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या
थकीत रकमांची वसुली : सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण
भंडारा : राज्यातील सहकारी पणन महासंघ, तालुका खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या बळकटीकरणासाठी शासनाने राज्यात अटल महापणन विकास अभियान ३१ मार्च अखेर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची उद्दिष्टये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व खरेदी विक्री संघ यांच्या कामात सुधारणा व पणन च्या या त्रिस्तरीय रचनेच्या बळकटीकरणातून राज्यातील शेतकऱ्यांना कृषि पणन विषयक सुविधा देवून आर्थिक उलाढाल वाढविणे आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने अटल महापणन विकास अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा मध्यवती सहकारी बँक भंडारा येथे १० फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला जिल्हयातील सर्व विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, खरेदी विक्री संस्थांचे पदाधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती, सचिव, सहसचिव व कृषि प्रक्रीय संस्थांचे अध्यक्ष व व्यवस्थापकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.
उदिष्टय साध्य करण्यासाठी राबविण्याचे उपक्रमांतर्गत गावातील १०० टक्के शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा सभासद करुन घेणे, तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला तालुका खरेदी विकी संघाचा सभासद करुन घेणे, प्रत्येक खरेदी विक्री संघ व प्रक्रीया संस्था पणन महासंघाची सभासद असणे आणि पणन महासंघ व खरेदी विक्री संघाचे सर्व उपक्रम विविध कार्यकारी सेवासहकारी सोसायटीद्वारे राबविणे, नियमाप्रमाणे या संस्थांनी इतरांकडे असणाऱ्या त्यांच्या थकीत रक्कमांची वसुली करणे असे आहे.
पणन महासंघ व इतर संस्थांचे गोदाम याचा वापर पूर्ण क्षमतेने करणे इत्यादींच्या माध्यमातून स्वत:चे खेळते भांडवल उभे करणे व आर्थिक स्थिती सुधारणे, पणन महासंघाने या संस्थांच्या माध्यमातून कृषि उत्पन्न बाजारात अन्न धान्य गतिमान करणे, पणन महासंघाने त्यांच्या स्वत:च्या खत कारखान्याच्या भगिरथ खतांचे व पुशखादय कारखान्यांच्या वैभव पशुखाद्यांचे उत्पादन वाढवून या सभासद संस्थांच्या माध्यमातून विक्री वाढविणे, बियाणे , कृषि अवजारे इत्यादींची खरेदी-विक्री वाढविणे. या संस्थांनी शासनाच्या इतर योजना जसे रेशन दुकान, द्वारपोच धान्य, अंगणवाडी प्राथमिक शाळा-आश्रमशाळा यांना पोषण आहार पुरवठा इत्यादीमध्ये सक्रीय सहभाग घेऊन उत्पन्न वाढविणे तसेच गरजेप्रमाणे जिवनावश्यक वस्तु खरेदी-विक्री या इतर कोणत्याही तत्सम क्षेत्रात उतरुन सस्थांची आर्थिक उलाढाल वाढविणे. महिला स्वयंसहाय्यता गटांची (बचत गटांची) उत्पादने व सेवाची विक्री या संस्थांद्वारे करुन सहकारी पणन व्यवस्था विकसित करणे हे या अटल महापणन विकास अभियानात अंर्तभूत आहे. (नगर प्रतिनिधी)