एटीएम बँकेचे, चालविते एजन्सी अन् सुरक्षा पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:58+5:30

पैसे काढणे जलदगतीने व्हावे यासाठी एटीएमची संकल्पना पुढे आली. शहरासह गावखेड्यातही एटीएम लावण्यात आले. बँकातील गर्दी कमी होऊन नागरिकांना तात्काळ पैसे मिळू लागले. एटीएमची संपूर्ण जबाबदारी बँकांची असा सर्वसाधारण समज आहे. मात्र बँकांनी ही सर्व जबाबदारी निवडलेल्या खासगी एजंसीला दिली आहे. बँकेचे एटीएमवर नाव असले तरी जबाबदारी मात्र काहीही नसते.

ATM of the bank, runs the agency and security police | एटीएम बँकेचे, चालविते एजन्सी अन् सुरक्षा पोलिसांवर

एटीएम बँकेचे, चालविते एजन्सी अन् सुरक्षा पोलिसांवर

Next
ठळक मुद्देसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर : जिल्हाभरात एटीएम फोडण्याच्या घटना, चौकीदारही दिसत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विविध बँकांचे ठिकठिकाणी असलेले एटीएम चालविण्याची जबाबदारी संबंधित बँकांनी खासगी एजन्सींकडे दिली. त्यांच्या माध्यमातून एटीएममध्ये रोकड टाकण्यापासून सुरक्षेपर्यंत सर्व कामे होणे अपेक्षित आहे. मात्र अलिकडे घडलेल्या एटीएम फोडण्याच्या घटनांवरून एजन्सी केवळ रोकड टाकण्यापलिकडे काहीही करीत नाही. शहर आणि गावखेड्यातील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा भंडारा शहरातील एटीएम फोडून नऊ लाख एक्केचाळीस हजार रुपये पळविण्याच्या घटनेतून पुढे आली आहे.
पैसे काढणे जलदगतीने व्हावे यासाठी एटीएमची संकल्पना पुढे आली. शहरासह गावखेड्यातही एटीएम लावण्यात आले. बँकातील गर्दी कमी होऊन नागरिकांना तात्काळ पैसे मिळू लागले. एटीएमची संपूर्ण जबाबदारी बँकांची असा सर्वसाधारण समज आहे. मात्र बँकांनी ही सर्व जबाबदारी निवडलेल्या खासगी एजंसीला दिली आहे. बँकेचे एटीएमवर नाव असले तरी जबाबदारी मात्र काहीही नसते. कोणतीही समस्या निर्माण झाली की बँका खासगी एजन्सीकडे बोट दाखविते. यातूनच एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्लीबोळात एटीएम लावण्यात आले आहेत. भंडारातील बहुतांश एटीएममध्ये सुरक्षा रक्षकही नसतो. स्वच्छतेचेही भान नसते. मशीनमधून निघालेल्या चिट्ठ्या अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. कॅमेराचीही दूरावस्था झालेली असते. रात्री तर एटीएम बेवारस असल्यासारखे दिसून येतात.
याचाच फायदा एटीएम फोडणारे चोरटे घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात अलिकडच्या काळात एटीएम फोडण्याचे प्रयत्न झाले. चार दिवसापूर्वी कन्टेन्मेंट झोनमधील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये असलेले एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख ४१ हजार रुपये लंपास केले. अद्यापपर्यंत चोरट्यांचा सुगावा लागला नाही. एटीएममध्ये कॅमेऱ्यांत स्पष्ट चित्रीकरण झाले नाही. एटीएम बँकेचे, चालविते एजन्सी आणि चोरी झाल्यास ताण मात्र पोलिसांना सहन करावा लागतो. चोरटे शोधताना पोलिसांची दमछाक होते. संबंधित बँक आणि एजन्सीवर समन्वय ठेवून सुरक्षा रक्षक नियुक्त केले तर चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो.

गल्लीबोळात एटीएम
विविध बँकांनी शहर आणि ग्रामीण भागात गल्लीबोळात एटीएम उभारले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही विचार न करता एटीएम सुरु केले आहेत. एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये अथवा इमारतीत एटीएम सुरु असते. विशेष म्हणजे एटीएम उभारताना पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही. हा प्रकार बिनबोभाटपणे सुरु आहे. चोरी झाल्यानंतर मात्र थेट पोलिसांकडे धाव घेतली जाते.

भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेचे दोन एटीएम आहेत. या पैकी एक ई-गॅलरी म्हणून ग्राहकांना सुविधा देत असते. या गॅलरीमधील एटीएम डिपॉझिट मशीन महिन्यातून बंद असते. तांत्रिक अडचणींमुळे डिपॉझिट मशीन बंद असल्याची सूचना तिथे लिहीली असल्याने अनेक ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागते. आॅनलाईन व्यवहाराचा उपयोग तरी काय? असेही ग्राहक आल्यानंतर बोलून दाखवितात.

Web Title: ATM of the bank, runs the agency and security police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम