एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:26+5:30

भंडारा जिल्ह्यात १२५ च्या वर एटीएम केंद्र आहेत. त्यातही एकट्या भंडारा शहरात ३५ च्या वर एटीएम आहेत. यात बहुतांश एटीएम हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक यासह अन्य १४ पेक्षा जास्त बँकांचे एटीएम आहेत. यातील बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये रोकड उपलब्ध नसल्याची ओरड होत असते.

 ATM security on the wind | एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षारक्षकांचा अभाव : पैशांचा नेहमीचा असतो ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आॅनलाईन व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर एटीएमचा वापर पूर्वीसारखा होत नसला तरी एटीएमची सुरक्षेकडे मात्र प्रचंड कानाडोळा होत आहे. एटीएम फोडणे, प्रयत्न असफल झाल्यास मशीनच उचलून नेणे आदी घटना घडत असताना भंडारा जिल्ह्यात मात्र एटीएमची सुरक्षा वाºयावर दिसून येत आहे. भंडारा शहरातील एटीएमची स्थिती रामभरोसे झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात १२५ च्या वर एटीएम केंद्र आहेत. त्यातही एकट्या भंडारा शहरात ३५ च्या वर एटीएम आहेत. यात बहुतांश एटीएम हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक यासह अन्य १४ पेक्षा जास्त बँकांचे एटीएम आहेत. यातील बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये रोकड उपलब्ध नसल्याची ओरड होत असते. विशेष म्हणजे या संदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने भंडारा शहरात फेरफटका मारला असता शहरातील बहुतांश एटीएम पैकी जवळपास ७० टक्के एटीएम केंद्र हे सुरक्षा रक्षकाविना आढळून आले. अनेक एटीएमचे दार सताड उघडे होते. याठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा असली तरी उघड्या दारांमुळे या यंत्रणेचा उपयोग होताना दिसत नाही. अनेक एटीएममध्ये तर मोकाट कुत्रांनी बस्तान मांडल्याचे दिसून येते.
बहुतांश एटीएम हे शहरातील मुख्य मार्गांवर स्थापित आहेत. मात्र अन्य चौकांमध्ये असलेल्या एटीएमची सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येते. खासगी बँकांच्या एटीएमचीही अशीच बिकट अवस्था आहे. काही एटीएम मध्ये एटीएमचे प्रवेशद्वारच तुटलेले असून स्वच्छतेचा अभाव आहे. वातानुकुलीत यंत्र कुठे बंद तर कुठे नादुरुस्त स्थितीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे गॅलरी असलेल्या बँकांच्या एटीएम सुविधा केंद्रात बहुतांश वेळी कॅश रिसीव्हींग मशीन नादुरुस्त असते. परिणामी नागरिकांना व्यवहारासाठी बँकेत जाऊन रांगेत तासन्तास उभे राहावे लागते. याकडेही बँक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
दिवसा एटीएममध्ये सुरक्षा रक्षक दिसत नाही. रात्रीच्या वेळीही अनेक एटीएम सुरक्षारक्षकाविना सताड उघडे असतात. काही खाजगी बँकाच्या एटीएमपुढे सुरक्षा रक्षक राहतात. परंतु राष्ट्रीयकृत बँकाचे एटीएम सुरक्षा रक्षकाविनाच आहेत. एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट ही नित्याचीच बाब झाली आहे. जिल्हा परिषदचौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये कायम पैशाचा ठणठणाट असतो. अनेक एटीएममध्ये शंभर आणि दोन हजारांचा नोटांचा तुटवडा असतो. त्यामुळे पाचशेपेक्षा कमी रक्कम काढू इच्छीणाºया ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. हा सर्व प्रकार सुरु असतांना याबाबत बोलायला कुणीही तयार नाहीत. परिणामी एटीएम कार्डधारक त्रस्त झाले आहेत.

एटीएम मशीन फोडण्याच्या घटनानंतरही उपाययोजना शून्य
भंडारा शहरातील राजीव गांधी चौक स्थित बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याची घटना गत महिन्यात घडली होती. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या एटीएममध्ये रोकड नव्हती. विशेष म्हणजे येथे सीसीटीव्ही कॅमेरा असला तरी त्याचाही फारसा उपयोग होत नाही. अशीच घटना पवनी तालुक्यातील कोंढा-कोसरा येथील एका बँकेच्या एटीएमध्ये घडली होती. यानंतर एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अनेकांनी संबंधित बँकाना याबाबत सुचनाही दिली. परंतु बँकानी हात वर केले. एटीएमची सुरक्षा ही आमची जबाबदारी नाही. संबंधित यंत्रणेला आम्ही आऊटसोर्सींग केले आहे. त्यामुळे आमचा एटीएमशी थेट संबंध नाही, असे सांगतात. यामुळे आता नागरिकही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. भंडारा शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील एटीएमची सुरक्षा वाºयावर दिसून येते.

स्वच्छतेकडे दुर्लक्ष
शहरातील एटीएम केंद्रांची अवस्था फारशी चांगली नाही. एटीएम केंद्रातच स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. डस्टबिन असल्यावरही नागरिक पैसे काढल्यावर छापील स्लीप तिथेच फेकून देतात. धूळ व माती हमखास दिसून येते. स्वच्छता होत असली तरी काही एटीएममध्ये सदर कार्य नियमितपणे होत नाही. एटीएमच्या देखरेखीकडे सर्वच बँकांच्या व्यवस्थापनेचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. याचा मानसिक त्रास येथे जाणाºया ग्राहकांना सहन करावा लागतो.

Web Title:  ATM security on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम