भंडारा शहरातील एटीएम सेवा ठरतेय ग्राहकांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:16+5:302021-07-09T04:23:16+5:30
बॉक्स सर्वाधिक तक्रारी राष्ट्रीयीकृत बँकेच्या बँकेचे कामकाज ग्राहकांसाठी अनेकदा त्रासदायक ठरत आहे. यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी बँक व्यवस्थापक ...
बॉक्स
सर्वाधिक तक्रारी राष्ट्रीयीकृत बँकेच्या
बँकेचे कामकाज ग्राहकांसाठी अनेकदा त्रासदायक ठरत आहे. यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी बँक व्यवस्थापक गरज आहे. सर्वाधिक तक्रारी या राष्ट्रीयीकृत बँकेच्या असल्याचे ग्राहकांनी सांगितले. शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. बँक कर्मचारी हे वारंवार हेलपाटे मारायला लावत असल्याने अशा बँक कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
बॉक्स
बँक अधिकारीच म्हणतात ते पैसे मिळणार नाहीत
एटीएममधून पैसे निघाले नसतानाच खात्यावरून पैसे कमी झाले. मात्र त्यानंतर सहा महिने बँकेकडे पाठपुरावा करूनही ते पैसे मिळाले नाहीत. याची विचारपूस करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या एका जबाबदार बँक व्यवस्थापकास विचारपूस केली असता ते पैसे पुन्हा मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र थेट आरबीआयकडे तक्रार करताच त्या महिलेच्या खात्यावर आठ दिवसांच्या आतच पैसे जमा झाल्याचे एका महिला खातेदारासह वर्षभरापूर्वी बँक ऑफ इंडियातून पैसे गेल्या एका खातेदारानेच सांगितले. यावरूनच बँकांच्या कामकाजाचा फटका कशा पद्धतीने बसतो याचा अनुभव येत आहे.
कोट
मी एका बँकेकडून मुद्रा लोन घेतले होते. मात्र त्यावेळी बँक कर्मचारी पुरेपूर माहिती देत नाहीत. त्यानंतर व्याजाचा भुर्दंड हा ग्राहकांवर बसतो. या सोबतच अनेकदा बँकेतील कामेही वेळेत होत नाहीत आणि बँकेतील कर्मचारी बोलण्यासाठी नेहमीच उदासीन असतात.
साबीर शेख, व्यापारी