केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:08+5:302021-09-18T04:38:08+5:30
केंद्र सरकारच्या अनियोजित धोरणामुळे गेल्या सहा वर्षांत प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे तरुणांत असंतोष निर्माण झाला असून, त्याचे परिणाम ...
केंद्र सरकारच्या अनियोजित धोरणामुळे गेल्या सहा वर्षांत प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे तरुणांत असंतोष निर्माण झाला असून, त्याचे परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक स्तरावर होत आहेत. बेरोजगारी वाढत असताना केंद्र सरकार कोणतेच उपाय करीत नसल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कारेमोरे, भंडारा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भूषण टेंभुर्णे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री बोरकर, भंडारा शहराध्यक्ष प्रशांत देशकर, तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव अनिकजमा पटेल, मंगेश हुमने, सचिन फाले, पवन वंजारी, शाईन मून, जितेंद्र नागदेवे, साहिल मेश्राम, निखिल तिजारे, सुनील सुखदेवे, शुभम तोंडाने, प्रणय नेवारे, अंकित गोंडाणे, सचिन सावळकर, निखिल आगलावे, जय डोंगरे, आनंद चिंचखेडे, जनार्दन निंबार्ते, मंगेश वंजारी, अतुल भोयर, पीयूष तेंडर, साहिल पत्रे, सौरभ श्रावणकर, चेतन बांडेबुचे, प्रिया निमजे, वैष्णवी आंबिलकर, प्रतीक्षा सुकीरवार, मुकुल पाडोळे उपस्थित होते.