भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 02:11 PM2020-12-21T14:11:14+5:302020-12-21T14:13:38+5:30

Bhandara News प्रतिबंधीत क्षेत्रातून वाहनजाऊ देण्यावरून हंगामी कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र  अधिकाऱ्यांवर वाहन चालकाने हल्ला केला.

Attack on forest range officials of Koka Sanctuary in Bhandara district | भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर हल्ला

भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देमारहाणीत हात फॅक्चर चंद्रपूर गेटवरील रात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा: प्रतिबंधीत क्षेत्रातून वाहनजाऊ देण्यावरून हंगामी कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र  अधिकाऱ्यांवर वाहन चालकाने हल्ला केला. ही घटना कोका अभयारण्याच्या चंद्रपूर गेटवर रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. यात वनपरिक्षेत्र अधिकाºयाचा हात फॅक्चर झाला असून एका आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन शंकर जाधव असे वनपरिक्षेत्र अधिकाºयाचे नाव  आहे. तर राहूल चौरसिया याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोका वन्यजीव अभयारण्या रात्रीच्या वेळी वाहन जाण्यास प्रतिबंध आहे. रविवारी दुपारी ३ वाजता वाहन क्रमांक एमएच ४० बीजे ९७९७ चंद्रपूर गेटवरून चंद्रपूर गेटवर नोंद करून कोका गावाकडे गेले. रात्री ७.३० वाजताच्या सुमारास हे वाहन परत आले.  त्यावेळी चंद्रपूर गेटवरील हंगामी मजुरांनी वाहन जावू देण्यास मनाई केली. त्यावरून वाद सुरू झाला. या वादात कोका येथील वाहन चालक अमर वाघाडे याला मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोळ्याला मार लागला. वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांचे निवासस्थान चेकपोस्ट नजीक असून भांडणाचा आवाज आल्याने ते त्या ठिकाणी गेले. भांडणात मध्यस्थी करीत असताना राहूल चौरसिया याने त्यांच्यासोबतही वाद घातला. मध्यस्थी करीत असताना राहूल चौरसियाने जाधव यांच्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. त्यात त्यांचा खांदा फॅक्चर झाला. त्यांना तात्काळ भंडाराच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर कारधा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून आरोपी राहूल चौरसिया याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथडा आणण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील केवट करीत आहे. अद्यापपर्यंत आरोपीला अटक केली नव्हती. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: Attack on forest range officials of Koka Sanctuary in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.