काँग्रेसतर्फे विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन १२ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:28 AM2017-12-05T00:28:07+5:302017-12-05T00:28:40+5:30

Attack on the Legislative Assembly by the Congress on 12th | काँग्रेसतर्फे विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन १२ रोजी

काँग्रेसतर्फे विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन १२ रोजी

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य सरकारने सरसकट कर्जमाफी न देता त्यात अनेक जाचक अटी घातल्यामुळे शेतकरी कर्जमुक्तऐवजी आत्महत्या करीत आहे.

आॅनलाईन लोकमत
भंडारा : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी न देता त्यात अनेक जाचक अटी घातल्यामुळे शेतकरी कर्जमुक्तऐवजी आत्महत्या करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसतर्फे १२ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातून पाच हजारावर कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे भंडारा जिल्हा प्रभारी प्रफुल गुडधे पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन कवाडे गट असा संयुक्त मोर्चा असून काँग्रेसचा मोर्चा दीक्षाभूमी ते टी-पार्इंट आणि राष्ट्रवादीचा मोर्चा धनवटे महाविद्यालय ते टी-पार्इंट असा दोन वेगवेगळ्या मार्गे येऊन टी-पार्इंटवर एकत्र जाहीर सभा होणार आहे. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसतर्फे राष्ट्रीय महासचिव गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार हे करतील. यावेळी खा. राजीव सातव यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविला. पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आ.सेवक वाघाये, जि.प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, प्रमोद तितीरमारे, सीमा भुरे, सभापती विनायक बुरडे, राजकपूर राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
वाघाये काढणार पदयात्रा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भंडारा जिल्हा काँग्रेस एकदिलाने काम करीत असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा १२ डिसेंबरला धडकणार आहे. ११ डिसेंबरला सकाळी ६ वाजता खरबी येथून कार्यकर्त्यांसह पैदल मार्च काढणार असल्याचे माजी आ.सेवक वाघाये यांनी सांगितले. खरबी येथून निघालेला हा मोर्चा गुमथळा येथे रात्री मुक्काम करेल. १२ डिसेंबरला दुपारी नागपूर टी-पार्इंट येथे पोहोचतील.

Web Title: Attack on the Legislative Assembly by the Congress on 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.