जुनी पेंशनसाठी ‘हल्लाबोल’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:46 PM2019-01-28T21:46:50+5:302019-01-28T21:47:04+5:30
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्यावतीने रविवारी जिल्हाकचेरी समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्यावतीने रविवारी जिल्हाकचेरी समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह विविध नेत्यांनी भेट देत कर्मचाऱ्यांचा मागणीला पाठिंबा दिला. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करुन नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरु केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. जुनी पेन्शन योजना आबाधित ठेवण्यासाठी संघटनेच्यावतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मडावी, राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, सचिव परमेश्वर येणकीकर, अमोल जांभुळे, सोपचंद सिरसाम, धोंडीराम हाके, विनोद किंडर्ले, दिलीप सोनुले आदी उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला होता. यात संघटनेचे मुबारक सैय्यद, रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, कालीदास माकडे, व्ही. पी. मुंडे, रवी रेहपाडे, भारत मेश्राम, डॉ. प्रविण टेंभुर्णे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुधीर माकडे यांनी तर संचालन संग्राम केंद्रे व उत्तम कुंभारगावे यांनी केले. आभार धोंडीराम हाके यांनी मानले.