अल्पभूधारक शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:38 PM2018-05-30T22:38:28+5:302018-05-30T22:38:42+5:30
चुल्हाड गावाचे हद्दीत असणाºया नालालगत सिमेंट प्लग बंधारा बांधकाम करताना अल्पभूधारक शेतकºयांची चक्क शेतीच गिळंकृत करण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्याला भूमिहिन करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला असून फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकरी कुटुंबाने केली असून आत्महत्याचा इशारा या कुटुंबियांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड गावाचे हद्दीत असणाºया नालालगत सिमेंट प्लग बंधारा बांधकाम करताना अल्पभूधारक शेतकºयांची चक्क शेतीच गिळंकृत करण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्याला भूमिहिन करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला असून फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकरी कुटुंबाने केली असून आत्महत्याचा इशारा या कुटुंबियांनी दिला आहे.
पावसाळा ऐन तोंडावर असल्याने कंत्राटदारास कामे पुर्ण करण्याची मोठी घाई गर्दी असल्याचे दिसून येत आहे. लघू पाठबंधारे विभाग मार्फत शेतकºयाचे विकास कार्यासाठी अनेक योजना शेतशिवारात सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजना पुर्णत्वाकडे नेताना शेतकºयांना मात्र विश्वासात घेण्यात आले नाही. देवरी देव येथील अल्पभूधारक शेतकरी रामदयाल अंबुले यांची चुल्हाड गावाचे हद्दीत नाला लगत ४० आर शेती आहे. याच शेतीच्या उत्पादनावर त्यांचे कुटुंबियाचे उदरनिर्वाह सुरू आहे. अल्पशेती असताना कुटुंबियाचे उदरनिर्वाहासाठी त्यांची मोठी धडपड आहे. या शिवाय येत्या काही दिवसात मुलीचे विवाह होणार असल्याने रामदयाल अंबुले हे विवाह कार्याचे तयारीत गुंतले आहे. याच संधीचा फायदा घेत मोटघरे नामक कंत्राटदाराने चक्क अल्पभूधारक शेतकरी अंबुले यांचे शेतीच्या १५ आर जागेत सिमेंट प्लग बंधारा बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे. बंधारा बांधकामात शेती गिळंकृत करण्यात आल्याचे मोटघरे नामक कंत्राटदाराला शेतकरी कुटुंबियांनी विचारले असताना कंत्राटदाराने मुजोरी करित हाकलून लावले आहे. या शिवाय बांधकामाला अडवणूक केल्यास धमकी दिली आहे. यामुळे शेतकºयांचे शेतशिवारात कंत्राटदारांची कुकूमशाही सुरू झाली आहे. ४० आर शेती असताना १५ आर बंधारा बांधकामात कंत्राटदाराने गिळंकृत केली आहे. उर्वरित २५ आर शेतीचे भरवशावर सहा सदस्यांचे उदरनिर्वाह करताना अडचणीचे ठरणार आहे. सिमेंट प्लग बंधारा बांधकामाचे सुरूवात करताना मोटघरे नामक कंत्राटदाराला शेती गिळंकृत होत असल्याचे सांगण्यात आले होते. या शिवाय कामे थांबविण्याची विनंती शेतकºयांचे महिला सदस्यांनी केली होती. शहरात १ फुट जागा कुणी सोडत नाहीत. परंतु या शेतात चक्क ०.१५ आर शेती बंधारा बांधकामात दिशेनाशी करण्यात आली आहे, असे असताना अन्य शेतकऱ्यांची शेती वगळण्यात आली आहे. बंधारा बांधकामाला विरोध नाही. परंतु नाल्याची जागा सोडून याच शेतकऱ्यांची शेतीत बंधारा बांधकामास सुरूवात करण्यात आली. रामदयाल अंबुले आणि अशोक पटले या दोन शेतकऱ्याची शेतजमिन शिवारात बंधारा बांधकाम करित असताना फक्त अंबुले यांची शेतीच यात गिळंकृत करण्यात आली आहे. कंत्राटदाराने मुजोरपणा करित शेती नेस्तनाबूत केल्याने या कुटुंबियाने आत्महत्या करावी काय, असा आरोप केला आहे. अल्पभूधारक शेतकरी असताना भूमिहीन होण्याची पाळी या शेतकऱ्यांवर कंत्राटदाराने आणली आहे. येत्या १५ दिवसात न्याय मिळाले नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आहे.
या शेतकऱ्यांची शेती बंधारा बांधकाम गिळंकृत करण्यात आली आहे. न्याय मागताना कंत्राटदाराची मुजोरी असल्याने अन्याय खपवून घेतले जाणार नाही. यात चौकशी करिता पाठपुरावा करणार आहे.
-सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष भाजपा किसान आघाडी तुमसर.
शेती गिळंकृत झाल्याने कुटुंबियावर उपासमारीची पाळी येणार आहे. न्याय मागताना कंत्राटदाराने मुजोरी केली असून न्यायासाठी सामूहिक आत्मदहन करणार आहे.
-रामदयाल अंबुले, अन्यायग्रस्त शेतकरी देवरी देव.