अबब! अडीच फुट उंचीचे गतीरोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 09:23 PM2017-09-03T21:23:05+5:302017-09-03T21:23:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत महालगाव ते नाकाडोंगरी मार्गावरून रेतीच्या ओव्हरलोडेड ट्रकची वाहतूक सुरू झाली असल्याने मार्गावर खड्डे पडले आहे. या मार्गावर मुरूमाचे अडीच फुट उंचीचे अपघाताला आमंत्रण देणारे गतिरोधक तयार करण्यात आली आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्ग आणि महालगाव ते नाकाडोंगरी असे दोन मार्ग राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत आहेत. १० कि़मी. अंतर लांबीचे असणाºया नाकाडोंगरी मार्गावर जिवघेणे खड्डे तयार झाली आहेत. याच मार्गाने मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यात रेतीची वाहतूक करण्यासाठी ट्रकची संख्या वाढली आहे. ओव्हरलोडेड रेतीच्या ट्रकमुळे मार्गाची दुरवस्था झाली आहे. वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा करण्यात येत आहे. या रेतीची वाहतूक सिहोरा पोलीस ठाण्याचे समोरून केली जात आहे. वाजवीपेक्षा अधिक रेती ट्रकमध्ये असताना तपासणी करण्याचे सौजन्य दाखविण्यात येत नाही. पोलीस आणि रेती माफियाचे यात साटेलोटे असल्याचा आरोप होत आहे.
महालगाव ते नाकाडोंगरी मार्गावर अनेक गावाचे वास्तव्य आहे. याच मार्गावर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आहे. याशिवाय तुमसर आगाराच्या बसेसच्या दोन फेºया आहेत. या मार्गावर खड्ड्याचे प्रमाण अधिक वाढल्याने रापमच्या प्रवाशी फेºया अडचणीत आलेल्या आहेत.
महालगावच्या नागरिकांनी ओव्हरलोडेड रेतीची वाहतूक बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रास्ता रोको आंदोलनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान महालगाव ते नाकाडोंगरी जिवघेणे खड्डे पडले असताना, या खड्ड्यात मुरूमाची लिपापोती करण्यात आली आहे. मार्गावर अडीच ते तीन फुट उंचीचे मुरूमाचे गतिरोधक तयार करण्यात आले आहे.
या गतिरोधकावर वाहनधारकांचे अपघात झालेले आहेत. याशिवाय तुमसर-बपेरा राज्य मार्गाची दुरावस्था झाली आहे. राज्य मार्ग जागो जागी उखडला आहे. परंतु मागील तीन वर्षात एक कि़मी. अंतरची साधी डांबरीकरणाने डागडुजी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता डांबरीकरणासाठी पुढाकार घेतला नाही.
यामुळे वाहन धारकाचे मरण स्वस्त झाले असल्याचे चित्र आहे. सिंदपुरी आणि मोहगाव खदान, बिनाखी गावानजीक राज्य मार्गाची अवस्था जीवघेणी झाली आहे. लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.