ज्योतिष्य हे कला नसून प्राचीन भारतीय शास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:59 PM2019-04-22T21:59:13+5:302019-04-22T21:59:35+5:30
आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून या शास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी दिवस, वार, नक्षत्र करण या पाच अंगाचा अभ्यास करून पंचांग तयार केले. पूर्वीच्या काळी पंचांगानुसार लोक आपले जीवनमान चालवित असत. परंतु आताच्या काळात पंचांगाचा अभ्यास कमी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून या शास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी दिवस, वार, नक्षत्र करण या पाच अंगाचा अभ्यास करून पंचांग तयार केले. पूर्वीच्या काळी पंचांगानुसार लोक आपले जीवनमान चालवित असत. परंतु आताच्या काळात पंचांगाचा अभ्यास कमी होत आहे. पंचांगाचा अभ्यास करून व ज्योतिष शास्त्राचा आधारे आल्या जीवनातील संकट दूर करावे व ज्योतिषाने सुद्धा समाज सेवेचे कार्य करावे, असे प्रतिपादन ज्योतिष विश्वविद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भुपेश गाडगे यांनी केले.
येथील साई प्लॉझा हॉटेल येथे आयोजित विश्वविद्यापीठ प्रा. कोलंबो श्रीलंका द्वारा संचालित ज्योतिष विद्यालय भंडारा येथे द्वितीय वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन, सरस्वती पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी प्राजक्ता संगीतराव यांनी सरस्वती स्तवन व नवग्रह स्त्रोत सादर केले.
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ. भुपेश गाडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. अनिल वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून ज्योतिष विद्यालय भंडाराचे संचालक प्राचार्य डॉ. हितेंद्र सोरटे यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हितेंद्र सोरटे यांनी ज्योतिष विद्यालयाने वर्षभरात जे उपक्रम राबविले त्याची माहिती व येणाऱ्या वर्षात होणाºया कार्यक्रमांची विस्तृत माहिती देण्यात आली.
विद्यालयाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पदवी प्रदान समारंभ पार पडला. यामध्ये विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉ. वनिता शाह, डॉ. रमेश उपलय, डॉ. मनिष खारा, डॉ. अरुणा येरणे, डॉ. कल्पना निकम यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी ज्योतिष विद्यालय भंडाराचे संस्थापक संचालक प्राचार्य डॉ. हितेंद्र सोरटे, मंजुषा सोरटे व आदित्य सोरटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन अतुल खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी धनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंकजकुमार राजाभोज, नंदराम लिमजे, दिलीपकुमार सार्वे, अनिल तिघरे, पवन हेडाऊ, अविनाश हटवार, लोकेश मोहबंशी, श्रीकांत सार्वे, प्रतिक येरणे, प्रकाश जाधव, शिवानी कावळे, मोनिका इंगोले, भारती जांभुळकर, अर्चना कोडापे यांनी मोलाचे सहकार्य केले.